आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येल्डा शिवारात बिबट्या आढळला; परिसरात भीतीचे वातावरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई : तालुक्यातील येल्डा गावानजीक असलेल्या शेंडगे वस्तीजवळील एका झाडाच्या आळ्यात बिबट्या बसल्याची माहिती गावकऱ्यांनी वन विभागाला देताच अधिकारी तत्काळ पोहोचले. मात्र, बिबट्या असल्याची खात्री करत असताना बिबट्या दिसला. त्याने काही क्षणात पळ काढला. त्यामुळे येल्डा व ममदापूर (परळी) परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
 
बालाघाटच्या डोंगरपट्ट्यात बिबट्या असल्याची चर्चा होती. त्या भागातील अनेक जनावरे फस्त केली गेली, परंतु बिबट्या दिसलाच नव्हता. शनिवारी दुपारी तीन वाजता येल्डानजीकच्या शेंडगे वस्तीजवळील झाडाझुुडपाच्या आळ्यात बिबट्या प्रत्यक्ष नागरिकांनी पाहिला. यानंतर याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. 

शेतकऱ्यांनी घाबरू नये...
शेतकरी व गावकऱ्यांनी बिबट्यास घाबरू नये. कारण तो रानडुकराची शिकार करतो. त्यासाठी सावधान राहून बिबट्या दिसल्यास वन कार्यालयाशी संपर्क साधावा. - एस. जी. वरवडे, वनपाल अधिकारी, अंबाजोगाई.
 
अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा येथे शनिवारी दुपारी बिबट्या आढळून आला असून वन विभागाने त्याला पकडण्यासाठी मोहीम सुरू केली.
बातम्या आणखी आहेत...