आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याने पाडला दोन वासराचा फडशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव - जंगलीकोठा शिवारात गोठ्यात बांधलेल्या दोन वासरांचा बिबट्याने फडशा पाडला. ही घटना 5 ऑगस्ट रोजी रात्री घडली. घटनेचा सोयगाव वनविभागाने पंचनामा केला. पायाच्या ठशावरून हल्ला करणारा प्राणी बिबट्या असल्याचा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. फय्याजखाँ रहेमान पठाण व राजाराम चिंधू भावसार या वरठाण येथील शेतकर्‍यांचे जंगलीकोठा येथे शेत आहे. शेतातच असलेल्या गोठ्यात त्यांनी दोन वासरे 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी बांधली. सकाळी पाहिले असता वासरे मृतावस्थेत आढळली.

वनविभागाला यासंदर्भात माहिती देण्यात आली. वनपाल के. बी. शिंदे, वनरक्षक आर.जे. वानखेडे, एस. ए. आगलावे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतावस्थेतील वासरे व पायांचे ठसे यावरून बिबट्याच्या हल्ल्यात वासरे ठार केल्याचा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे.