आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळीत 390 मेगावॅट वीज निर्मिती घटली ; पाचशेऐवजी 360 मेगावॅट निर्मिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- कोळशाच्या तुटवड्याचा परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रालाही फटका बसला अाहे.  तीन संचांपैकी  २५० मेगावॅट क्षमतेचा  एक संच बंद असून  उर्वरित  सुरू असलेल्या दोन्ही संचांतून  पाचशे मेगावॅट वीज निर्मिती होणे आवश्यक असताना केवळ  ३६० मेगावॅट वीज निर्मिती  होत आहे. सध्या १६ हजार टनच कोळसा औष्णिक केंद्रात उपलब्ध आहे. परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील  एकूण पाच संचापैकी संच क्रमांक ४,५  हे  दोन वर्षांपासून बंद  आहेत.  वीज निर्मिती केंद्रात २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक आठ हा  सध्या कोळशाअभावी बंद आहे. या केंद्रातील संच क्रमांक सहा व सातमधून  प्रत्यक्ष ५०० मेगावॅट वीज निर्मिती होणे गरजेचे असताना केवळ सध्या ३६० मेगावॅट वीज निर्मिती होत आहे.  त्यामुळे तीनही संचांची वीज निर्मिती क्षमता ७५० मेगावॅट असताना केवळ ३६० मेगावॅट वीज निर्मिती होत असल्याने  ३९० मेगावॅट वीज निर्मिती घटली आहे. जसा जसा कोळसा उपलब्ध होईल, तसतशी  वीज निर्मिती सध्या होत आहे. 

नागरिकांत असंतोष 
सध्या राज्यभरात भारनियमन केले जात असल्याने उद्योगांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आगामी काळात मुबलक कोळसा उपलब्ध झाला नाही तर वीज निर्मिती कमी होण्याची  शक्यता आहे. 

१६ हजार टनच कोळसा शिल्लक
सध्या केंद्रात १६ हजार टन कोळसा शिल्लक आहे. मंगळवारी आणखी दोन रेल्वे मालगाड्यांतून  कोळसा आला आहे. एका प्लँटसाठी किमान एक मालगाडी कोळसा लागतो. त्यामुळे काेळसा वाढला तर वीज निर्मितीही निश्चित वाढेल, असे औष्णिक वीज निर्मिती  केंद्राचे मुख्य अभियंता  विठ्ठल खटारे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...