आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालिकेचा खून करणार्‍या पित्याला जन्मठेप, मातेचे दोषारोपपत्र बाल न्यायालयाकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारूर - बालिकेचा खून करणाऱ्या आरोपीस माजलगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेप व दीड हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. मोमीन मजहर ऊर्फ बब्बू मोमीन मजीद (रा. मोमीनपुरा, बीड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.

उपळी तलावात नवजात बालिकेचा मृतदेह आढळला होता. धारूर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. नाक, तोंड दाबून खून करण्यात आल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. पोलिस उपनिरीक्षक संजय सुतनासे यांनी धारूर ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक अंगद सुडके यांनी केला. यात दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक भारत राऊत यांनी बार्शी नाका भागात आराेपीचा शोध घेतला. मोमीन मजहर याच्या घरी तपासणी केली असता मुलीचे जन्म प्रमाणपत्र सापडले. पोलिसांनी चौकशी करताच त्याने कबुली दिली. राऊत यांनी त्याला धारूर पोलिसांच्या ताब्यात दिले. माजलगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.व्ही. मोराळे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षाने १० साक्षीदार तपासले. संजय सुतनासे डॉ.विजय घोळवे, डॉ. अर्जुन जायभाये तपास अधिकारी अंगद सुडके, भारत राऊत यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.
मातेचे दोषारोपपत्र बाल न्यायालयाकडे
या प्रकरणातील बालिकेची आई अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तिचे वेगळे दोषारोप बाल न्यायालयाकडे पाठवले आहे. या प्रकरणातील अन्य दाेन आरोपी जमील मोमीन व नसीमबेगम यांची सबळपुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. बालासाहेब गिते यांनी काम पाहिले.