आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोर्ड लावताना करंट लागून दोन तरुणांचा मृत्यू, दोन जण गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - शहरातील अंबाजोगाई रस्त्यावरील कॉम्पेक्सवर जाहीरातीची बोर्ड लावताना करंट लागल्याने रविवारी दोन तरूणांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

आकाश सोमनाथ लोखंडे (२३) महेश अच्युत तनमोर (२१, दोघेही रा. सावरगाव, ता. लातूर) अशी मयतांची नावे आहेत. जखमीमध्ये दीपक विश्वनाथ लोखंडे दिनेश लोखंडे यांचा समावेश आहे. हे चौघे दिवानजी कॉम्पलेक्सच्या तिसऱ्या मजल्यावर एका फीटनेस क्लबचा बोर्ड लावत होते. फीटनेस क्लबचा मालक दीपक लोखंडे असून, तोही गंभीर जखमी झाल्याने शुध्दीवर नाही. दुसरा जखमी दिनेश लोखंडेचा जवाब पोलिसांनी घेतला आहे.

मयत जखमी एकमेकांचे नातेवाईक असून, ते सकाळी ११ वाजता मोठा बोर्ड लावण्यासाठी कॉम्पेक्सवर गेले होते. यावेळी बोर्ड हायव्होल्टेज तारेवर पडल्याने जखमी दोघे विजेचा धक्का बसून खाली पडले तर मयत दोघे जागेवरच शंभर टक्के भाजले. आकाश महेशला येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. जखमी दोघांवर शहरातील एका खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. फीटनेस क्लबचा मालक दीपक लोखंडेवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...