आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगवेगळ्या घटनांत वीज पडून 6 जण ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना/औरंगाबाद/बीड - मागील दोन दिवसांत वीज पडून वेगवेगळ्या घटनांत सहा जणांचा मृत्यू झाला. यात जालना जिल्ह्यातील तीन औरंगाबाद जिल्ह्यातील एक व बीड जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.
जाफराबाद व जालना तालुक्यांत वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. जाफराबाद तालुक्यातील कुंभारी येथील विकास नामदेव पडघन (18) व जालना तालुक्यातील कचरेवाडी येथील जनार्र्दन अंकुश खंडाळे (32) यांचा मृतांत समावेश आहे. विकास पडघन यांचा बुधवारी सायंकाळी 6, तर जनार्र्दन खंडाळे यांचा गुरुवारी दुपारी 4 वाजता मृत्यू झाला. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोमवार, मंगळवार व बुधवार या तीन दिवसांत 20.53 मिमी एवढा पाऊस झाला असून आतापर्यंत जिल्ह्यात 567.94 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यात जालना 638.14 मिमी, भोकरदन 544.27 मिमी, जाफराबाद 708.55 मिमी, बदनापूर 424.8 मिमी, परतूर 676.6 मिमी, अंबड 548.1 मिमी, घनसावंगी 348.31 मिमी, मंठा 655 मिमी एवढा पाऊस झाला आहे.
खामखेडा शिवारात महिलेचा मृत्यू : भोकरदन तालुक्यातील खामखेडा शिवारात अंगावर वीज पडून कडूबाई काकडे (55) या वृद्धेचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी 4.30 वाजता ही घटना घडल्याची माहिती सरपंच गजानन नागवे यांनी दिली.
सिल्लोड तालुक्यात युवकाचा मृत्यू : सिल्लोड तालुक्यातील आधारवाडी तांडा येथे शेतात बैल चारत असलेला आनंदा शिंदे (20) याचा वीज पडल्याने मृत्यू झाला.
केज तालुक्यात दोघांचा बळी : तालुक्यातील साळेगाव आणि आडस परिसरात वीज पडून दोघांचा बळी गेला. नागझरी येथील चांगदेव मुंडे (23) हा युवक साळेगावच्या खडी क्रशर केंद्रावर गेला होता. त्याच्या ट्रॅक्टरवर वीज कोसळली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दुस-या घटनेत आडस येथील माणिक खाडे शेतातून घरी परतत असताना अंगावर वीज पडून त्याचाही मृत्यू झाला.