आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परळीत गावठी दारूचा अाणखी एक बळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - परळी तालुक्यातील वसंतनगर परिसरात दारूबंदीसाठी अनेक दिवसांपासून लढा सुरू असताना गावठी दारूच्या व्यसनामुळे अाणखी एकाचा मृत्यू झाला. दारू विक्रेत्यांवर कारवाईशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा मृताच्या कुटुंबीयांसह दारूबंदी चळवळीतील कार्यकर्त्यांनी घेतला. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

शहराजवळ असलेल्या वसंतनगर येथील देविदास लक्ष्मण राठोड (६५) यांना गावठी दारू पिण्याचे व्यसन जडले होते. याच व्यसनापायी त्यांचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. दरम्यान, वसंतनगर तांड्यावर सुरू असलेली दारू बंद होण्यासाठी अनेक दिवसांपासून दारूबंदी कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. देविदास यांच्या मृत्यूनंतर दारूबंदी मंडळाच्या महिला व देविदास राठोड यांच्या कुटुंबीयांनी परळी ग्रामीण ठाणे गाठत दारू विक्रेत्यांवर कारवाई झाल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतला. ग्रामीण पोलिसांनी मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. शनिवारी सकाळीही नातेवाइकांनी दारू विक्रेत्यांवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले. आठवडाभरात गावठी दारू अड्ड्यांवर कारवाईचे आश्वासन पोलिस निरीक्षक रामकृष्ण चाटे यांनी दिल्यानंतर राठोड यांच्यावर अंत्यसंस्कार झालेे.

प्रश्न ऐरणीवर : दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून धारावती तांडा, वसंतनगर तांडा येथे दारूच्या अड्ड्यांमुळे परिसरात तरुणांसह नागरिकांना दारूचे व्यसन जडल्याने दारूबंदी करण्याची मागणी येथील दारूबंदी मंडळ करत आहे. परंतु किरकोळ कारवायांशिवाय ठाेस काहीच होत नाही. शुक्रवारी देविदास राठोड यांच्या म़ृत्यूनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
बातम्या आणखी आहेत...