आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारुकांडात आणखी एकाचा तरवडीत बळी, चौकशीसाठी तिघे ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे फाटा - पांगरमल येथील दारूकांडात एकापाठोपाठ बळी गेल्यामुळे नगर जिल्हा बदनाम झाला अाहे. या पार्श्वभूमीवर नेवासे तालुक्यातही बुधवारी एकाचा बळी गेला. तरवडी येथील बिबन इब्राहिम सय्यद (३२) याचा मद्यसेवनाने मृत्यू झाला. याच गावातील आणखी दोघांना मद्यसेवन केल्यामुळे रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात अाले आहे. 

 
भेंडे-कुकाणे सीमेवर असलेल्या एका हॉटेलला पोलिसांनी सील ठोकले आहे. नसीर इस्माईल सय्यद व छबू ऊर्फ प्रशांत भाऊसाहेब विधाटे (तरवडी)  अशी उपचार घेत असलेल्या दोघांची नावे आहेत. मृत बिबन हा बांधकाम मजूर आहे. नेवासे पोलिसांनी गावातल्या चारजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. बिबनला चार दिवसांपासून मद्यसेवनाचा त्रास होत होता, असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.
 
त्याला मंगळवारी कुकाण्यातील खासगी रूग्णालयात केले हाेते, मात्र प्रकृती खालावल्याने बुधवारी सकाळी त्याला नगरला हलवण्यात आले. रस्त्यातच त्याने प्राण सोडला. नसीरला विळद घाटातील विखे रूग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळपर्यंत तो बेशुद्धावस्थेत होता. छबूच्या डोळयांवर बनावट दारूचा परिणाम झाला आहे. पांगरमलच्या घटनेत जशी परिस्थिती मद्यपिंची झाली होती, तशीच अवस्था तरवडीतील रूग्णांची झाली आहे.  
बातम्या आणखी आहेत...