आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नड उत्पादन शुल्क विभागाचे १६ गावठी दारू अड्ड्यांवर छापे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - मुंबई येथे विषारी दारू प्यायल्याने शंभराहून अधिक लोकांना जीव गमावावा लागला. त्यामुळे राज्यभर अवैध दारू धंद्यांवर कारवाईचा बडगा सुरू असतानाच मंगळवारी कन्नड उत्पादन शुल्क विभागाने १६ ठिकाणी छापे टाकले. यात एक लाख दोन हजार रुपयांची दारू नष्ट करण्यात आली आहे.

आठ दिवसांपासून मंुबई विषारी दारू प्रकरण राज्यभर गाजत आहे. त्याअनुषंगाने औरंगाबाद जिल्ह्यातही गावठी दारू बनवणार्‍यांवर कडक कारवाई केली जात आहे. तसेच अवैध दारूविक्री गावठी दारू पाडण्याचे अड्डे उद्ध्वस्त केले जात आहे. त्यानुसार नागद परिसरात असलेल्या कजगाव रस्त्यावरील धरण परिसरात चार ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने छापा मारला. यात १३०० लिटर रसायन, तर सोनवाडी गावाजवळील धरणाजवळ तीन ठिकाणी छापा मारून १८०० लिटर रसायनासह साहित्य असा एकूण ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कन्नड येथील नरसिंगपूर शिवारात चार ठिकाणी छापा मारून १५ हजार ४८० रुपये किमतीच्या ७७४ लिटर रसायनासह साहित्य जप्त केले. खुलताबाद परिसरात पाच ठिकाणी छापे मारून ६१२ लिटर रसायन जप्त करण्यात आले. त्यांची किंमत १२,२४० एवढी आहे. ही कारवाई औरंगाबाद उत्पादन शुल्क विभागाचे पथक कन्नड येथील उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे केली. या पथकात निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पी. व्ही. वाणी, दुय्यम निरीक्षक व्ही. यू. गोरे, आर. एन. रोकड, गणेश पवार, ए. जी. शिंदे, यू. ए. सय्यद, ए. जी. शेंदरकर, बी. सी. किरवले, आर. एन. भारती, ए. एम. कोतकर यांनी भाग घेऊन ही कारवाई यशस्वी केली. त्यामुळे तालुक्यासह विभागात अवैध हातभट्टी दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
बातम्या आणखी आहेत...