आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Listening Suspension Order Anganwadi Sevika Go High Blood Pressure

निलंबनाचा अादेश मिळताच सेविकेचा रक्तदाब वाढला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: सिव्हिलमध्ये उपचार घेताना सेविका उज्ज्वला एडके
बीड - कामातील अनियमिततेमुळे तालुक्यातील पाच अंगणवाडी सेविकांवर बुधवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. आदेश हातात पडताच पाचपैकी एका अंगणवाडी सेविकेचा रक्तदाब वाढल्याने त्या चक्कर येऊन काेसळल्या. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता पंचायत समितीमधील बालविकास प्रकल्प अधिका-यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला. उज्ज्वला सिद्धेश्वर एडके असे सेविकेचे नाव असून त्या रामतीर्थवर भागातील आहेत.

बीड तालुक्यातील नामलगाव, जिरेवाडी, घोसापुरी, रामतीर्थ, बहिरवाडी येथील अंगणवाडी सेविकांच्या विरोधात तक्रारी आल्याने बालविकास प्रकल्प अधिका-यांनी त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. बुधवारी पाच सेविकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचे पत्र प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी एस. वाय. तांदळे यांनी दिले. सेविकांना बालविकास प्रकल्प कार्यालयात बोलावून निलंबन आदेश देण्यात आले. आदेश हाती पडताच रामतीर्थ भागातील अंगणवाडी सेविका उज्ज्वला एडके यांचा अचानक रक्तदाब वाढून त्या जमिनीवर कोसळल्या. त्यांना जिल्हा रुग्णालात दाखल केले अाहे.
अन्यथा आंदोलन
अंगणवाडी सेविकांवर झालेली कारवाई चुकीची अाहे. निलंबन मागे घेतले नाही तर कर्मचारी संघटना आंदोलन करेल, असे संघटनेच्या राज्याध्यक्षा मंगला सराफ आणि जिल्हाध्यक्ष संध्या मेश्राम यांनी सांगितले.
संघटनेची दादागिरी
पाच महिलांना यापूर्वीही समज देण्यात आली आहे. या सेविका संघटनेच्या नावाखाली ब्लॅकमेल करतात. यापूर्वीही त्यांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई झालेली आहे. या महिलांबाबत अनेकदा तक्रारी आलेल्या आहेत. कारवाई केल्यास दबाव आणला जातो. कारवाई एकतर्फी नाही. ''
एस. वाय. तांदळे, प्रभारी सीडीपीओ