आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Update महाराष्ट्र: भाजपमध्ये बंडाळी, भुसावळ पंचायत समितीमधून आमदार सावकारेंचा फोटो हटवला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - उमेदवारी वाटपात डावलल्याने नाराजीनाट्य उफाळलेल्या भुसावळ भाजपमध्ये शनिवारी सायंकाळी धक्कादायक घडामोडी घडल्या. पंचायत समितीमधील सभापतींच्या दालनातील भाजपचे आमदार संजय सावकारे यांची प्रतिमा काढून टाकल्याने एकच खळबळ उडाली.
 
विधानसभा निवडणुकीपूर्वी पंचायत समिती सदस्य राजेंद्र चौधरी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार संजय सावकारे यांच्या प्रेमापोटी भाजपमध्ये डेरेदाखल झाले होते. यानंतर पंचायत समितीमध्ये ८पैकी पाच सदस्य सोबत असूनही भाजपच्या काही लोकांनी त्यांना पंचायत समिती सभापतीपदापासून दूर ठेवले होते. मात्र,वर्षभरापूर्वी राजेंद्र चौधरींना पंचायत समितीचे सभापतीपद मिळाले. या कालावधीत त्यांनी तालुका हागणदारीमुक्त करण्यासह इतरही दखलपात्र कामे केली. मात्र, पंचायत समितीच्या आरक्षणात भुसावळ तालुक्यातील त्यांचा हक्काचा हतनूर गण राखीव झाल्याने ते कुऱ्हा पानाचे गणातून भाजपकडून इच्छूक होते. आमदार संजय सावकारे यांच्या सूचनेनुसार त्यांनी उमेदवारी अर्जदेखील भरला होता. मात्र,ऐनवेळी ‘राजकीय गेम’ झाल्याने चौधरींच्या नावावर भाजपने फुली मारली. यामुळे चौधरी समर्थकांमध्ये विश्वासघाताची भावना बळावली होती. याचे पडसाद शनिवारी उमटले. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पंचायत समितीमध्ये सभापतींच्या दालनातील आमदार संजय सावकारे यांची प्रतिमा सभापती राजेंद्र चौधरी यांनी काढून टाकली. ही वार्ता तालुक्यात पसरताच खळबळ उडाली.
 
काय म्हणाले चौधरी... 
आमदार संजय सावकारे यांची प्रतिमा सभापती दालनात मी स्वत: लावली होती. शनिवारी मीच ती  प्रतिमा काढली. निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना धडा शिकवू. आमदार सावकारेंनीच तिकिट वाटपाची प्रक्रिया राबवली. त्यांनीच मला डावलले. 
-राजेंद्र चौधरी, सभापती, पंचायत समिती, भुसावळ
 
पुढील स्लाईडवर वाचा.... औरंगाबादच्या बदनापूरजवळ नॅनोचा अपघात.... एक ठार....
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...