आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोदगा येथे शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर-शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी औसा तालुक्यातील लोदगा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शेतकरी संघटनेच्या वतीने कर्ज व वीज बिलमुक्ती अभियान राबविण्यात येत असून त्याची सुरुवात ऑगस्ट क्रांतिदिनी रास्ता रोकोने करण्यात अाली. संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, मराठवाडा अध्यक्ष रामजीवन बोंदर, जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. दुष्काळमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक, मानसिक खच्चीकरण होत आहे. तरीही शासन गंभीर नसल्याने शेतकऱ्यांचा सरकारवरील विश्वास उडत असल्याने शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले असून यापुढे सभा, मेळावे, मोर्चे, धरणे करून शेतकऱ्यांचा संताप व्यक्त केला जाणार असल्याचे या वेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

सरकारकडून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी दिली जाणारी दीड हजाराची रक्कम म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. चारा आणि पाणी प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नैसर्गिक आपत्ती जाहीर करून प्रति हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, साखर कारखानदारांनी आपली मालमत्ता विकून शेतकऱ्यांची थकबाकी द्यावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. आंदोलनात राम मसलगे, अॅड. सचिन शिंदे, रतन इंद्राळे, कालिदास भंडे, मोहन गंगणे, बजरंग बिराजदार, हरिश्चंद्र सलगरे, रामचंद्र खंदाडे, राजाराम पाटील, अरुण पाटील, बापूराव कुलकर्णी आदी सहभागी झाले होते.