आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या चाचणीस सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून गुरुवारी (दि.30) दुपारी बारा वाजता पाणी सोडून चाचणीस सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे प्रथमच सिंचनाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यासंदर्भात दै. दिव्य मराठीने सातत्याने पाठपुरावा केला आहे.

जिल्ह्याच्या सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या निम्न दुधना प्रकल्पात गतवर्षीच्या पावसाळ्यात प्रथमच पाणीसाठा 60 टक्क्यांवर गेला होता. त्यात उपयुक्त जलसाठा 80 टक्के होता. त्यामुळे रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली. त्यादृष्टीने प्रकल्प प्रशासनाने गुरुवारी उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी धरणग्रस्तांच्या उपस्थितीत घेतली. धरणग्रस्तांचे प्रतिनिधी विष्णुपंत वांजोळकर, डॉ. प्रदीप चव्हाण, उमाकांत मानवतकर, आसाराम लाटे, प्रदीप कदम, शेख अकबर, कार्यकारी अभियंता डी. टी. शिंपणे, रमाकांत केंद्रे यांच्यासह शेतकरी या वेळी उपस्थित होते. प्रकल्पाच्या जिवंत पाणीसाठय़ातून उजव्या कालव्यात 16 कि.मी. पर्यंत 100 क्युसेकच्या टप्प्याटप्प्याने पाणी सोडून चाचणी घेण्यात येणार आहे. चार ते पाच दिवसांत हे पाणी पोहोचेल. उजव्या व डाव्या कालव्याची कामे प्रगतिपथावर आहेत. रब्बी हंगामासाठी शेतकर्‍यांना पाणी देता यावे, यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती कार्यकारी अभियंता डी. टी. शिंपणे यांनी दिली.