आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलन शांततेत पार पाडणे ही सबनीसांचीच जबाबदारी : माधव भंडारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केज - मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी साहित्यावर बोलावे. पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करून त्यांनी नवीन वाद निर्माण केला आहे. त्यामुळे साहित्य संमेलन सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी सबनीस यांचीच आहे, असे मत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले.

केज येथे व्याख्यानाच्या निमित्ताने माधव भंडारी आले असता ‘दिव्य मराठी’शी त्यांनी संवाद साधला. सबनीस यांनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करीत जे जाहीरपणे वक्तव्य केले त्यावर त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला माफीनामा दिला. माफीनामा अत्यंत शिवराळ भाषेत असून यावर अापले समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याच्या विरोधातच आपण आहोत, असेही भंडारी यांनी सांगितले.

सबनीस हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याच्या लायकीचे आहेत का, असा प्रश्न माधव भंडारी यांनी उपस्थित करून त्यांनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करून नवा वाद निर्माण केला आहे. सबनीस यांनी साहित्य संमेलनात फक्त साहित्यावरच बोलावे, अन्यथा परत पूर्वीसारखीच नौटंकी केली तर ती त्यांना अधिक महागात पडेल, असा इशारा भंडारी यांनी दिला आहे. हिंमत असेल तर त्यांनी साहित्य आणि विचारावर परिसंवाद घडवावा, असेही ते म्हणाले.

केलेल्या लिखाणावर चर्चा घडवावी

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, संत जनाबाई व इतर महान व्यक्तींवर केलेल्या लिखाणावर साहित्य संमेलनात हिंमत असेल तर चर्चा घडवून आणावी, असे खुले आव्हान भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिले.

सबनीसांचे १६ मिस कॉल
भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी हे व्याख्यानासाठी केज येथे आले असता काही तासांच्या कालावधीतच श्रीपाल सबनीस यांचे १६ मिस काॅल येऊन पडल्याचे माधव भंडारी यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...