आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामंडळ नियुक्त्या, शिवसेनेची यादी आली नाही, भाजपची तयार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोकरदन- राज्यातील महामंडळांच्या रखडलेल्या नियुक्त्यांवर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या भाेकरदन येथील निवासस्थानी गुरुवारी महत्त्वाची बैठक घेण्यात अाली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे सर्व विभागाचे संघटन महामंत्री, प्रदेश सरचिटणीस या बैठकीस उपस्थित हाेते.

या बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळली जात हाेती. यामुळे जालना जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात गुरुवारी भाजपच्या या बैठकीबाबतच दिवसभर चर्चा हाेती. पक्षाच्या पुढील वाटचालीसाेबतच महामंडळावरील अध्यक्ष सदस्यांच्या निवडीबाबत यात महत्त्वाची चर्चा झाली. भाजपची यादी यात निश्चित करण्यात अाल्याची माहिती बैठकीस उपस्थित असलेल्या सूत्रांनी दिली अाहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महामंडळाच्या अध्यक्ष, सदस्य निवडीचा महत्त्वाचा विषय गेल्या अनेक दिवसांपासून रखडला आहे. या वेळी अनेक पदाधिकारी, ज्येष्ठ नेत्यांनी महामंडळांवर नियुक्तीसाठी आपापल्या नेत्यांकडे शिफारस करून मोर्चेबांधणी केली आहे. शेवटी महामंडळाचा लाल दिवा कुणाला मिळतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गुरुवारी ही यादी निश्चित झाली असून या वेळी नियुक्त्या कुणाला मिळणार याची उत्सुकता देखील सर्वांना आहे.

स्थानिक निवडणुकांवर मंथन
घटकपक्षातील समन्वय, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या विषयांवर दोन दिवस चर्चा करून मंथन करण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटन महामंत्री रवींद्र भुसारी, सुनील कर्जतकर, प्रदेश सरचिटणीस सुरजितसिंग ठाकूर, संघटनमंत्री किशोर काळकर, रवी अनासपुरे, भाऊराव देशमुख, सतीश धोंड, रामदास आंबटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

नियुक्त्या रखडल्याची चर्चा
जीमहामंडळे शिवसेनेकडे जाणार आहेत. त्या महामंडळांवरील पदाधिकाऱ्यांची नावे शिवसेनेने सुचवायची आहेत. शिवसेनेकडून अद्यापही १० महामंडळांच्या पदाधिकाऱ्यांची यादी मिळालेली नाही. या नियुक्त्या रखडल्या असल्याची चर्चा या वेळी बैठकीत करण्यात आली अाहे.
बातम्या आणखी आहेत...