आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राच्या वेशीमध्ये कन्नडिगांची दादागिरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरगा - महाराष्ट्राच्या सीमेत घुसून कर्नाटकचा फलक लावण्याचे कर्नाटक रक्षणा वेदिका संघटनेचे मनसुबे पोलिसांनी मंगळवारी उधळून लावले. पोलिसांनी संघटनेच्या नऊ कार्यकर्त्यांना अटक केली. या घटनेमुळे सीमेवर दिवसभर तणाव होता.

संघटनेचे कार्यकर्ते जमावासह महाराष्ट्रात कर्नाटकचा फलक लावणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे बिदर जिल्ह्यात नाकेबंदी करण्यात आली. ही माहिती उमरगा पोलिसांना ही दिली होती.
कर्नाटक पोलिसांनी बारा वाहनांना हुमनाबाद, बिदर, भालकी, शहाजनी औराद येथे पकडले. त्यांना महाराष्ट्र सीमेकडे येण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला. मात्र, काही कार्यकर्ते अन्य मार्गाने जीपमधून तलमोडजवळील महाराष्ट्र सीमेवर आले. आधीच सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आली.