आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Election 2014, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठवाड्यात ४३ लाख जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाची कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड/जालना/फुलंब्री - भरारी पथकाने सोमवारी मराठवाड्यात तीन मोठ्या कारवाया केल्या. यामध्ये जालन्यात आठ लाख रुपयांची रोकड जप्त केली, नांदेड जिल्ह्यातील नरसी (ता. नायगाव) येथे ३२ लाख तर औरंगाबाद शहराजवळील सावंगी टोल नाक्यावर २ लाख ९० हजार रुपये पथकाने पकडले. जालन्यात तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

नायगाव तालुक्यातील नरसी येथे सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमाराला स्थिर निगराणी पथकाने (एसएसटी) कारमधून (एमएच १४ डीएम ७६५२)३२ लाख रुपयांची रक्कम ताब्यात घेतली. या कारमध्ये मनोज निवृत्ती रणबाबळे (रा. हडको), शंकर प्रकाश वडजे (रा. रातोळी), अशोक भुजंग हनवते (रा. तरोडा नाका) व संजय विश्वनाथ वाघमारे होते. रामतीर्थ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जगताप यांनी विचारपूस केली असता ही रक्कम बँकेची असल्याचे सर्वांनी सांगितले. ही खरोखरच बँकेची आहे का याचा तपास रामतीर्थ पोलिस करीत आहेत.

जालना शहरालगत मंठा रोडवरील चौधरीनगर चेकपोस्टजवळ सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नाकेबंदी करत असताना परभणीकडून येणा-या स्विफ्ट कारमधून (एमएच २२ क्यू १९९) ८ लाख ३० हजार रुपयांची रक्कम आढळली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या चारही चौफुल्यांवर पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. सोमवारी सायंकाळी परभणी िजल्ह्यातील शिंगणापूर येथील वैजनाथ किसनराव खिल्लारे हे औरंगाबादकडे जात असताना पोलिसांच्या तपासणीत त्यांच्या गाडीत ८ लाख ३० हजार रुपये आढळले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत वैजनाथ खिल्लारे, ड्रायव्हर अंगद दुधाटे यांच्याकडे पोलिस चौकशी करीत होते. सहायक पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, तहसीलदार रेवनाथ लबडे यांनीही भेट देऊन माहिती घेतली. एपीआय चौधरी, ज्ञानेश्वर नागरे, इ. जे. दिलवाले, सुभाष पवार, गोरख डिघोळे यांनी ही कारवाई केली.