आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Election 2014 News In Marathi, Prithviraj Chavan, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत ३० सप्टेंबरला प्रचाराचा शुभारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानीचे आशीर्वाद घेऊन काँग्रेसच्या प्रचाराचा मंगळवारी (३० सप्टेंबर) तुळजापुरात शुभारंभ होणार असून, या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उद्योगमंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रचाराच्या समारंभाची माहिती देण्यासाठी पाटील मंगळवारी तुळजापुरात आले होते. या वेळी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण उपस्थित होते. सहकारमंत्री पाटील म्हणाले की, मंगळवारी दुपारी १२ वाजता शहरातील हडको मैदानावर प्रचाराची जाहीर सभा होणार आहे. या सभेला उस्मानाबादसह लातूर, बीड, सोलापूर जिल्ह्यातील उमेदवार उपस्थित राहतील, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेतील राजकारण स्थानिक विषय
उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीबाबत पत्रकारांनी विचारल्यानंतर हा स्थानिक विषय असून राज्यस्तरावरील विषय वेगळे असतात, असे सहकारमंत्र्यांनी सांगितले.