आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; बहुरंगी लढती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - मागील पंधरा दिवसांपासून उडालेला प्रचाराचा धुरळा उद्या सोमवारी (दि. १३) सायंकाळी ६ वाजता शांत होणार आहे. जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत ७७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. घनसावंगीत १५ वर्षे मंत्री असलेले राजेश टोपे यांची लढत त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार विलास खरात यांच्याशी होत आहे.

विकासाची भाषा कमीच, आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
उस्मानाबाद | सर्वपक्षीय लढती झाल्याने विकासकामांऐवजी एकमेकांवर आरोपांच्या तोफा डागण्यापलीकडे ठोस मुद्दा प्रचारात दिसून आला नाही. चार मतदारसंघांतून ५६ उमेदवार नशीब आजमावत आहेत. सर्वाधिक उमेदवार उस्मानाबादमध्ये आहेत.

लातुरातील सहा विधानसभा मतदारसंघांतून ८९ उमेदवार
लातूर | जिल्ह्यात सर्व मतदारसंघांत काही ठिकाणी चौरंगी, तर काही जागांवर बहुरंगी लढती होत आहेत. सहा मतदारसंघांतून ८९ उमेदवार असून सर्वाधिक २३ उमेदवार लातूर शहर मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत.
शेवटचा हात फिरवण्यासाठी उमेदवार वाड्यावस्त्यांवर
हिंगोली | प्रचारासाठी काही तासच शिल्लक असल्याने सर्वच प्रमुख उमेदवार शहरी भागांसह वाड्यावस्त्या पिंजून काढत आहेत. तिन्ही विधानसभांमध्ये एकूण ४३ उमेदवार रिंगणात आहेत.