आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरड कोसळल्याने पारधच्या जवानाचा कुपवाडात मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारध - महाराष्ट्र रेजिमेंटमध्ये हवालदार म्हणून सेवा बजावत असलेले भोकरदन तालुक्यातील पारध येथील जवान रवींद्र सुरडकर (३५) शहीद झाले आहेत. जम्मू-काश्मीर येथील कुपवाडा येथे गस्त घालताना बर्फाची दरड कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शनिवारी सकाळी पारध येथील घरी पोहोचणार आहे. ते महाराष्ट्र रेजिमेंटमध्ये १९९५ मध्ये भरती झाले. प्रशिक्षण मध्य प्रदेश येथे घेतल्यानंतर त्यांनी आसाम येथे कर्तव्य बजावले, सध्या ते काश्मीर येथील कुपवाडा भागात कर्तव्यावर होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, आई-वडील असा परिवार आहे. जालना
बातम्या आणखी आहेत...