आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता नसल्याने आदिवासी बांधवांची परवड; गरोदर महिलेला खाटेवर न्यावे लागते रुग्णवाहिकेपर्यंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गरोदर महिलेला चिखल तुडवत रुग्णवाहिकेपर्यंत नेणारे ग्रामस्थ. - Divya Marathi
गरोदर महिलेला चिखल तुडवत रुग्णवाहिकेपर्यंत नेणारे ग्रामस्थ.
हिंगोली-  तालुक्यातील नांदापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणारे करवाडी हे  आदिवासीबहुल गाव. येथील ग्रामस्थ गेल्या १५ वर्षांपासून रस्त्यासाठी संघर्ष करीत आहे. या गावाला रस्ताच गंभीर रुग्ण व गरोदर महिलांना रुग्णालयात नेणे अत्यंत जिकिरीचे ठरत आहे.  रविवारी तर एका गरोदर महिलेला प्रसूतीसाठी चक्क खाटेवर टाकून चिखलातून रस्ता तुडवत सुमारे एक किमीवर उभ्या रुग्णवाहिकेपर्यंत नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली.

करवाडी गावाला नांदापूर गावापर्यंत जाण्यासाठी ५ किमी अंतर जावे लागते. हा रस्ता कच्चा असून पावसाळ्यात तो पूर्णत: चिखलमय होतो. त्यामुळे वाहनांसाठी तर सोडाच पायी जाण्यासाठीही कामाचा राहत नाही. याबाबत नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे  गेल्या १५ वर्षांपासून पाठपुरावा केला. निवेदने दिली आहेत. तसेच बरेच वेळेस धरणे आंदोलनेही केले.  पण प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. शनिवारी रात्रीपासून गावातील सुनीता रामा माघाडे या महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. पोट  गावाबाहेर रात्रीच्या वेळी जाण्यासाठी धड रस्ता नसल्यामुळे  रात्री तिला रुग्णालयात नेणे शक्य झाले नाही. रविवारी सकाळीच रुग्णवाहिका बोलावण्यात आली. परंतु   रस्ता नसल्याने ती गावापर्यंत येऊच शकत नव्हती.  तरीही ग्रामस्थांनी विनंती केल्याने रुग्णवाहिका  शक्य तितका चिखल तुडवत गावाच्या  एक कि.मी. दूरपर्यंत आणून उभी केली. 
 
चिखलमय वाटेत रुग्णांना त्रास
चिखलमय वाटेवर नागरिकांनाही नीट चालत येत नसल्याने महिलेला खूप त्रास सहन करावा लागला. आजच्या बाका प्रसंगामुळे या गावाच्या रस्ता समस्या पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
 
 
खाटेचे स्ट्रेचर
अडलेल्या गरोदर महिलेला रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यासाठी खाटेचाच स्ट्रेचरसारखा वापर करून एक किमीवरील रुग्णवाहिकेपर्यंत नेण्याचे ठरवले.  सकाळी ११ वाजता गावातील नागरिकांनी त्या महिलेला नांदापूर रस्त्यावर खाटेवरच आणून रुग्णवाहिकेत टाकले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. नागरिकांना चिखलातून नीट चालताही येत नव्हते.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि व्हिडिओ    
बातम्या आणखी आहेत...