आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाशिवरात्रीला तीन लाख भाविक घृष्णेश्वरचरणी लीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर राज्यभरातून आलेल्या तीन लाख भाविकांनी श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेतले. साधारणत: सकाळी साडेआठच्या सुमारास दर्शन रांग लक्षविनायक मंदिरापर्यंत पोहोचली. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी भागांतून भाविक वेरूळमध्ये आले होते. साधारणत: दुपारी चारच्या सुमारास भगवान घृष्णेश्वराचा चांदीचा मुखवटा पालखीतून वाजतगाजत शिवालय तीर्थावर नेण्यात आला. तिथे मुख्य पुजारी रवींद्र पुराणिक यांच्यासह समस्त ब्रह्मवृदांनी महाभिषेक केला. हा सोहळा पाहण्यासाठीही भाविकांची अलोट गर्दी झाली. साधारणत: साडेसहाच्या सुमारास पालखी वाजतगाजत मंदिरात नेण्यात आली. त्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी पुन्हा गर्दी केली. दरम्यान, आयजी अमितेशकुमार यांनी सायंकाळी पाचच्या सुमारास सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. संबंधितांना सूचना देत त्यांनी पूजाही केली.

३० लाखांची उलाढाल
पुजेचेसाहित्य, खेळण्या, घरगुती वस्तू, बच्चे कंपनीसाठी खाऊ, शाेभेच्या वस्तूंची अनेक दुकाने मंदिर परिसरात थाटली असून मंगळवारी दिवसभरात ३० लाखांची उलाढाल झाली.

कडेकोट बंदोबस्त

मंगळवारी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी हर्ष पोद्दार, पोलिस उपअधीक्षक प्रीतम यावलकर, पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे क्षणोक्षणी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत होते. या चौघांनी दिवसभर पायी िफरून सर्वत्र पाहणी केली. त्यांच्यासह १५० पोलिस कर्मचारी, दरोडा प्रतिबंधक पथक, जलद कृृती दल, दंगाकाबू पथक, बॉम्बशोधपथक, श्वानपथक आदींनी चोख बंदोबस्त ठेवला.

भारनियमनाचा फटका

यात्राकाळात भारनियमन करण्यात येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, मंगळवारी सकाळी ११ ते या दरम्यान वीज गुल झाल्यामुळे यंत्रणेची दमछाक झाली. व्यावसायिकांनाही अडचणींचा सामना करावा लागला. भारनियमन होणार नाही, या विचाराने व्यावसायिकांनी पर्यायी व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे अचानक वीज जाताच व्यावसायिकांची धांदल उडाली.

प्रभावी वाहतूक व्यवस्था

भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. रविवारी रात्री झालेल्या अपघातानंतर पोलिसांनी वेरूळ लेणी ते गोखले चौक या दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली.

मोफत चहा, फराळ
दान शूरांनीपिण्याचे पाणी, चहा, फराळाची व्यवस्था केली. ग्रामपंचायत झेडपीच्या वतीने पाणीपुरवठा, विजेची व्यवस्था, आरोग्य सेवा आदींनी प्राधान्य देण्यात आले. गोंदी ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.