आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन जुन्या मार्गानेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - येथील बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेवाचे महाशिवरात्रीनिमित्त दर्शन घेण्यासाठी जुन्याच मार्गाने भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. खुलताबाद - गंगापूर मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी प्रशासनाच्या संबंधित सर्व विभागासह घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायतीसह व्यापारी असोसिएशनची बैठक घेत नव्याने इनामी जागेतून दर्शन मार्ग बनवण्याचे प्रशासनास आदेश दिले होते. प्रशासनाने काही दिवसांपूर्वी तशी तयारीही चालू केली होती. परंतु अचानक आलेल्या अवकाळी पावसाने लावलेली हजेरी व इनामी जागेत उभी असलेली पिके पाहता प्रशासनाने आहे त्याच जुन्या दर्शन मार्गावर बॅरिकेडिंग केली असून याच मार्गे भाविकांना दर्शनास सोडण्यात येणार आहे. महाशिवरात्रीनंतर दर्शन मार्गात बदल करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी राजू नंदकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. घृष्णेश्वर मंदिरामध्ये दर्शनास येणाऱ्या लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर ४५ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी रात्री बारा वाजता मंदिर उघडल्यानंतर मंगळवारी रात्री नऊ वाजता मंदिर बंद होईल. शासकीय पूजेस खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी निधी पांडे यांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती अध्यक्ष दीपक शुक्ल यांनी दिली.