आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मच्छीमार महिलांवर हल्ला करणारे सहा जण अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - माजलगाव धरणात मासेमारी करू नये, यासाठी भोईवस्तीवरील मच्छीमारांवर जीवघेणा हल्ला करणार्‍या माणिकशहा संस्थेच्या सहा गुंडांना पोलिसांनी अटक केली. या गुंडांना न्यायालयाने 5 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

माजलगाव धरणातील मासेमारीवरून माणिकशहा मत्स्य व्यवसाय संस्था व भोई समाजातील मच्छीमार यांच्यात वाद पेटला होता.शुक्रवारी गावगुंडांनी भोईवस्तीवर काठय़ा, कुर्‍हाडीसह केलेल्या हल्ल्यात नऊ महिला व चार पुरुष असे 13 जण जखमी झाले. यात एका गर्भवतीचा समावेश आहे. याप्रकरणी माजलगाव ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले. शनिवारी पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी भेट देऊन मच्छीमार महिलांची चौकशी करत आरोपींना तातडीने अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

रविवारी सकाळी यातील शेख जमील शेख अन्सार, शेख बशीर शेख बुढन, शेख अजीम शेख दिलावर, शेख अखील शेख अन्सार, शेख जावेद शेख महेमूद, शेख दिलावर शेख महेमूद यांना अटक करण्यात आली. सहाही आरोपींना पोलिसांनी माजलगावचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. गुजर यांच्यासमोर हजर केले होते.
आज सर्वपक्षीय बंद
भोई समाजातील मच्छीमारांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी सर्व पक्ष व आव्हान संघटनेच्या वतीने माजलगावात कडकडीत बंद ठेवला जाणार आहे. तहसीलदार डॉ. अरुण र्ज‍हाड यांना निवेदन देण्यात येईल.