आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा शिक्षक अटकेत, माजलगाव तालुक्यातील सुलतानपूर येथील घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - माजलगाव तालुक्यातील सुलतानपूर जिल्हा परिषद शाळेत सहावीच्या मुलीची छेडछाड करणार्‍या शिक्षकावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
सुलतानपूर येथील जिल्हा परिषद शाळेत सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शाळा सुटली. त्यानंतर शाळेतील सहावीच्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थिनीस दुसर्‍या वर्गात विसरलेला गॉगल आणण्यासाठी शिक्षक रवींद्र वाघमारे याने पाठवले. काही वेळात तिच्यापाठोपाठ वर्गात जाऊन तिची छेडछाड करून विनयभंग केल्याचा प्रकार घडला. त्या दिवशी मुलगी घरी गेली; पण तिने कोणालाही हा प्रकार सांगितला नाही. दुसर्‍या दिवशी मंगळवारी हा प्रकार मुलीने आईला सांगितला. बुधवारी मुलीची आई शाळेत गेली. शाळेत शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमास आलेल्या ग्रामस्थांशी भेटून त्यांनी शाळेत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर ग्रामस्थांनी मुलीच्या आईला बरोबर घेऊन माजलगाव ग्रामीण पोलिस ठाणे गाठले. तेथे मुलीने दिलेल्या तक्रारीवरून शिक्षक रवींद्र वाघमारे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी वाघमारेला अटक केली. शिक्षकाकडून शाळकरी मुलींवर अत्याचार होण्याची आठ दिवसांतील ही दुसरी घटना आहे.