आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजलगाव धरणाचे नऊ दरवाजे उघडले, सिंदफणा नदीपात्राशेजारील गावांना दक्ष राहण्याची सूचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - माजलगाव धरण शंभर टक्के भरले असून बुधवारी पाण्याची आवक वाढल्याने अर्धा मीटरने नऊ दरवाजे उघडण्यात आले. २२ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
मंगळवारी माजलगाव धरणातील पाण्याचा विसर्ग कमी झाल्यामुळे केवळ एकाच दरवाजाद्वारे १० सेंमीने विसर्ग सुरू होता. मात्र, बुधवारी मध्यरात्री पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने टप्प्याटप्प्याने माजलगाव धरणातून सुरुवातीला सात, तर दुपारी चार वाजता दरवाजांमध्ये वाढ करण्यात आली. अशा प्रकारे नऊ दरवाजांतून अर्धा मीटरने २२ हजार क्युसेकने सिंदफणा पात्रात परत एकदा पाणी सोडण्यात आले. यामुळे सिंदफणा नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहत आहे.

माजलगाव तालुक्यातील मनूर, शिंपेटाकळी, रोशनपुरी, नागडगाव, सांडसचिंचोली, देपेगाव आदी सिंदफणा नदीपात्राशेजारील गावांना दक्ष राहण्याची सूचनाही प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. दरम्यान, माजलगाव धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे ४४२ क्युसेक पाणी परळी, नांदेड, परभणी मातोळीसाठी मंगळवारी दुपारी सोडण्यात आले आहे. दरम्यान, हे पाणी सोडण्यात आल्याने छोटे-मोठे तलाव भरले जाणार असून शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...