आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Majalgaon Love Couple Found At Pune, Arrested By Police

माजलगावच्या दोन प्रेमी युगुलांना पुण्यात पकडले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड: गावातील दोन तरुणांनी पळवून नेलेल्या माजलगाव तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलींना पकडण्यात आले आहे. दोघींची रवानगी बालसुधारगृहात करण्यात येणार आहे.
गुंजथडी येथील अमोल यशवंत खोपे व सचिन खोपे यांनी गावातील दोन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून 24 ऑक्टोबरला पळवून नेले होते. शोध घेऊनही आईवडिलांना मुली सापडल्या नाहीत. गावातील तरुणांनीच त्यांना पळवून नेल्याचे लक्षात आल्यावर 25 रोजी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. माजलगाव पोलिसांना शोध लागत नसल्याने पंधरा दिवसांपूर्वी प्रकरण बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे आले. पुण्यातील वाघोली येथे मुली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुदर्शन मुंढे यांना समजली. मुंडे, उपनिरीक्षक भारत राऊत यांच्या पथकाने चौघांना ताब्यात घेतले. एका मुलीचे आई-वडील ऊसतोड मजूर असून, दुसरीचे मोलमजुरी करतात.
गावात चौघांच्या गाठीभेटी होत असत. घरच्यांना त्याची माहिती नव्हती. अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची कबुली युगुलांनी दिली. पुण्यात ते अडीच महिने पती-पत्नीप्रमाणे राहिले. दोन्ही तरुण बांधकाम मजूर म्हणून काम करत होते, असे पोलिसांनी सांगितले.