आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोई समाजाच्या वस्तीवरील हल्ल्याच्या निषेधार्थ माजलगाव शहर बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - ठेकेदाराच्या गुंडांनी भोई समाजाच्या वस्तीवरील केलेल्या हल्ल्यात नऊ महिला व चार पुरुष जखमी झाले होते. हल्ला करणार्‍या गुंडाना त्वरित अटक करून खोटे अ‍ॅट्रॉसिटी गुन्हे रद्द करावे या प्रमुख मागणीसाठी सोमवारी माजलगाव शहरात सर्वपक्षीय बंद करण्यात आला.

माजलगाव धरण हे मासेमारी करण्यासाठी खुले करावे, या मागणीसाठी ठेकेदार व मच्छिमार यांच्यात मागील काही महिन्यांपासून वाद चालू आहे. मच्छिमार भोई समाजाने हे धरण खुले करावे, या मागणीसाठी बीड, माजलगाव व धरणांत मोठे आंदोलन केले होते.

तेव्हापासून ठेकेदार व मच्छिमार यांच्यात वाद वाढत गेला. यातच शुक्रवारी ठेकेदार व त्यांच्या 50 ते 60 गुंडांनी धरणाजवळील भोई वस्तीवर हल्ला केला. जखमी गर्भवती महिलेला गर्भपात करावा लागला. प्रमुख आरोपी अद्यापही फरार असल्याने 4 जुलै रोजी शहर बंदचे आवाहन केले करण्यात आले होते. मोर्चेकर्‍यांना पोलिसांनी अडवल्यामुळे काही काळ तणाव झाला होता.

(फोटो : माजलगाव येथील गर्भवती महिलेच्या अन्यायाविरुद्ध जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर सोमवारी महिलांनी बांगड्या फोडून निषेध नोंदवला. छाय : दीपक जवकर)