नांदेड- नांदेड विद्यापिठाजवळ काल (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास भरधाव ट्रकने वऱ्हाडाच्या मिनी बसला जोरदार धडक दिली. यात 9 प्रवासी जागीच ठार झाले तर 16 जण जखमी असून त्यातील 6 प्रवाशांती प्रकृती गंभीर आहे. बारडहून निघालेले हे वऱ्हाड कर्नाटकातील गुलबर्ग्याला जाणार होते. नांदेडमधील सहारे कुटुंबातील हे वऱ्हाड होते.
हा अपघात एवढा भीषण होता, की मिनी बसचा अगदी चक्काचूर झाला आहे. मिनी बसचे वरचे टप्पर पूर्णपणे नाहिसे झाले आहे. काही सिट्स बाहेर फेकल्या गेल्या आहेत. अपघातात 9 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी जखमी प्रवाशांना सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यातील 6 प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
पुढील स्लाईडवर बघा, घटनास्थळाचे फोटो... बस अशी झाली चक्काचूर....