आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लासूर बाजार समितीत एक लाख क्विंटल मका खरेदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर - मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मोंढ्यात आतापर्यंत चालू हंगामातील सुमारे एक लाख अकरा हजार क्विंटल मक्याची खरेदी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा २० हजार क्विंटलने वाढला आहे. यात सुमारे बारा कोटी रुपयांच्या उलाढालीत बाजार समितीला उत्पन्नापोटी १२ लाख रुपये मिळाले असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संभाजी पाटील डोणगावकर यांनी दिली.

यंदा पिकांपुरता पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मक्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्याचे चित्र परिसरात दिसून आले. मात्र शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणून पांढरे सोने म्हणून कापसाकडे बघितले जाते. कापूस निघण्याआधी शेतकऱ्यांसमोर दिवाळीचा सण येऊन ठेपल्याने त्यात मका काढून शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी केली. त्या वेळी ओला मका असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी सातशे-साडेसातशे रुपये क्विंटल दराने भाव मिळाल्याने निराशाच आली.

सध्या १०५० ते १२०० रुपये सरासरी भाव प्रतिक्विटंल दराने शेतकऱ्यांना मिळत आहे. शक्यतो शेतकऱ्यांनी वाळून मका आणल्यास भाव चांगला मिळेल, असे बाजार समितीचे सचिव कचरू रणयेवले यांनी सांगितले. दिवाळीच्या सणामुळे लासूर स्टेशन परिसरातील शेतकऱ्यांचा मका मोठ्या प्रमाणात विविध आडत दुकानांवर विक्रीसाठी आला. मात्र सध्याही बाजारपेठेत शेतकऱ्यांची मका वाहनांसह गर्दी दिसून येत आहे. आता दररोज हजारो गोण्यांची तर मोकळ्या वाहनातील मक्याची आवक मोठ्या प्रमाणात मोंढ्यात सुरू आहे. मका वगळता इतर भुसार मालाची आवक अत्यंत नगण्य झाली आहे.

आवक वाढली
यंदाच्या हंगामातील मक्याची आवक ही एक लाख अकरा हजार क्विटंल एवढी झाली आहे. दिवाळीत दररोज शेतकऱ्यांच्या मक्याची आवक वाढली होती. सुरुवातीला मका ओला असल्याने शेतकऱ्यांना म्हणावा तसा भाव मिळाला नाही. माॅवशर चांगले असले तर बाराशे-तेराशे रुपयांपर्यंत भाव व्यापारी देतात. इतर भुसार मालाची आवक बाजारपेठेत अत्यंत नगण्य आहे. - कृष्णा पाटील डोणगावकर, कृउबा माजी सभापती, लासूर स्टेशन

मका सुकवून आणावा
शेतकऱ्यांचा मका मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी विविध अाडत व्यापाऱ्यांकडे येत आहे. शेतकऱ्यांनी ओला मका न आणता सुकवून आणावा. त्यात शेतकऱ्यांना जास्त भाव मिळतो. त्यात आम्हीही समाधानी असतो. - महेंद्र पांडे, संचालक तथा अाडत व्यापारी
बातम्या आणखी आहेत...