आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Make Water Planing Regional President Manikrao Thakre

पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणचे पाण्याचे स्रोत झपाट्याने कोरडे पडत चालले आहेत. त्यामुळे एप्रिल ते जुलै या पाणीटंचाईची स्थिती आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यासाठी शासनाकडून आवश्यक निधी दिला जाईल. मात्र, अधिका-यांनी पुढील काळातील नियोजन आतापासूनच करावे असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले. त्यांनी सोमवारी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेटी दिल्या त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले की, दुष्काळी उपायोजनांसाठी आवश्यक असलेला निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिला जाईल. मात्र, पुढील काळात चारा उपलब्ध करणे पाणी उपलब्ध करणे मोठे आव्हान असणार आहे. याबाबतचे नियोजन करण्यासाठी आपण मुख्यमंत्री आणि मदत पुनर्वसन विभागाशी चर्चा करणार असल्याचे माणिकराव ठाकरे यांनी याप्रसंगी सांगितले. जागोजागी चारा छावण्या सुरू करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे तसेच अनेक गावांमध्ये अद्यापही रोजगार हमीचे कामे अद्याप सुरू झालेले नाही, त्यामुळे तिथे कामे सुरू केली जाणार आहेत. राज्यातील ज्या भागात दुष्काळी परिस्थिती आहे, तेथील लोकांच्या मदतीसाठी शासनाकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत, त्यात अधिका-यांनीही जनतेची अडवणूक न करता सर्व प्रकारची मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.