आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्यदिनी तेराशे विद्यार्थ्यांची मानवी साखळीद्वारे तिरंगा ध्वज बनवून मानवंदना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शासकीय-निमशासकीय, शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटनांच्या वतीने जिल्हाभरामध्ये ७० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वेरूळ येथील गुरुदेव समंतभद्र विद्यामंदिर (गुरुकुल) मध्ये १३०० विद्यार्थी ४० शिक्षकांनी मानवी साखळीद्वारे तिरंगा ध्वज बनवून मानवंदना दिली. तसेच या दिनाच्या औचित्यावर विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करणाऱ्या गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. बच्चे कंपनीमध्येही उत्साहा होता. 

लासूर स्टेशन: येथील शिवाजी मैदानातील सार्वजनिक ध्वजारोहण जिल्हा परिषद प्रशाला केंद्रीय प्राथमिक शाळा, नूतन कन्या शाळेतील विद्यार्थिनींच्या उपस्थितीत सरपंच रश्मीताई जैस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पालक उपस्थित होते. ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण उपसरपंच गणेश व्यवहारे यांनी केले. शासकीय विश्रामगृहात हत्ते यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. 

बाजार समिती कार्यालयात सभापती संभाजी पाटील डोणगावकर संचालक मंडळाच्या वतीने उपसभापती दादा पाटील जगताप यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी वाल्मीक चव्हाण, कारभारी वंजारे, संदीप आढाव, स्वरूपचंद कुकलारे, सुरेश जाधव, सोपान बोरकर, सुनील पाखरे, फकीरचंद पवार, व्यापारी मनोजकुमार मुथा, सचिव कचरू रणयेवले, रामदास तायडे, गंगाधर निमसे, बाळासाहेब अाव्हाळे, नानासाहेब नेमाने, किशोर नरोडे आदींसह शेतकरी, व्यापारी, हमाल, कर्मचारी उपस्थित होते. छत्रपती शाहू महाविद्यालय न्यू हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालयात ७१ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष अप्पासाहेब रामकृष्ण बाबा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते सादर केली.
 
इतिहास विभागप्रमुख प्रा. परसराम शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्यावरील भित्तिपत्रकाचे विमोचन कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच सत्कार करण्यात आला. शालेय समिती अध्यक्ष सोपानराव चव्हाण, प्राचार्य डॉ. साहेबराव नाईकवाडे, प्राचार्य आर. एस. कहाटे, शिल्लेगावचे पोलिस उपनिरीक्षक संदीप काळे, अशोक गंगावणे, भीमराव पांडव, उपप्राचार्य अरुण भराडे, उपप्राचार्य प्रा. विलास आहिरे, शिक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते. लासूर स्टेशन येथील बी.एल.डी. कृषी महाविद्यालय साई कनिष्ठ महाविद्यालयात कुलगुरू डाॅ. अंजू मॅडम, कुलगुरू सिंघानिया विद्यापीठ राजस्थान नवी दिल्ली यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थापक बापूसाहेब देशमुख, तर प्रमुख पाहुणे डाॅ. संजू तनवार उपस्थित होते. प्रमुख अतिथींचे स्वागत प्रणिता देशमुख, महाराष्ट्र बँकेचे प्रबंधक मंगेश देशमुख यांच्या हस्ते झाले. स्वप्निल देशमुख, भारत राठोड, देविदास जाधव, मयुरी देशमुख आदींसह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. लासूर स्टेशन जिल्हा परिषदेच्या प्रशालेत मुख्याध्यापक राजेंद्र खेमनर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
 
नूतन कन्या शाळेत मुख्याध्यापक अरुण कानाडे, एमपी सोसायटी कार्यालयात अध्यक्ष रावसाहेब पाटील डुबे, शिल्लेगाव पोलिस ठाण्यात सपोनि मिलिंद खोपडे, लासूर स्टेशन पोलिस चौकी येथे पोलिस उपनिरीक्षक संदीप काळे, प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद आल्हाट यांनी ध्वजारोहण केले. 

गाजगावातल क्ष्मीबाई जाधवांच्या हस्ते ध्वजारोहण 
गाजगावयेथील शहीद जवान सोमनाथ जाधव यांच्या स्मारका ठिकाणी शहीद जवानाच्या आई लक्ष्मीबाई भीमराव जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी श्री गणेश विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सलामी दिली. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते. यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच कडूबा हिवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेचे ध्वजारोहण सेवा संस्थेचे चेअरमन संतोषराव काळवणे, जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर काळवणे, श्रीगणेश विद्यालयात शालेय समिती अध्यक्ष उत्तमराव काळवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर भाषणे सांस्कृतिक कार्यक्रमातून उपस्थितांची मने जिंकली. खादगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली. समीक्षा भारत गवळी या विद्यार्थिनीने घोड्यावर स्वार झाशीची राणीची वेशभूषा करून प्रभात फेरीचे आकर्षण वाढवले. यानंतर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापिका प्रतिभा नगरकर, सविता चौधरी, ग्रामस्थ उपस्थित होते. 

नागापूर: करंजखेडयेथील कै. कौशल्याबाई गोरे प्रतिष्ठान संचालित स्वामी विवेकानंद प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये राहुल वळवळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सूत्रसंचालन दयानंद चौतमल यांनी केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण गोरे, सर्जेराव घुगे, रोहिदास बनसोड, विलास ससे, रोहिदास काळे, कैलास जाधव, सहशिक्षक अस्लम मिर्झा, गजानन राऊत, दयानंद चौतमल, शीतल देठे, रेणुका तुपे, अमन पठाणसह शिक्षकवृंद, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. 
 
नागापूर: चिमणापूरमाध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातून प्रभातफेरी काढली. नागेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक काशीनाथ मोहिते यांच्या हस्ते ध्वजवंदaन करण्यात आले. या वेळी माजीa उपसरपंच उत्तमराव सपाटे, विश्राम बलांडे, पोलिस पाटील विठाबाई सोनवणे, शिक्षक अशोक मनगटे, गिरीश तामटे, अविनाश सोळुंके, गणेश माळी, शेषराव सोनवणे उपस्थित होते. 

वेरूळ: येथीलगुरुदेव समंतभद्र विद्यामंदिर (गुरुकुल) मध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त १३०० विद्यार्थी ४० शिक्षकांनी मानवी साखळीद्वारे तिरंगा ध्वज बनवून तिरंगा ध्वजास मानवंदना दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांनी एका सुरात दहावीच्या संस्कृत पाठ्यपुस्तकातील नमामि राष्ट्रध्वजम हे गीत सादर केले. यशस्वितेसाठी मुख्याध्यापक गुलाबचंद बोराळकर, पर्यवेक्षक सुकुमार नवले, प्रदीप माद्रप, कला शिक्षक वीरेंद्र वाकळे, क्रीडा शिक्षक संजय महाजन, आशिष कान्हेड यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले. 
 
पैठण: तालुक्यातीलथेरगाव येथील एस. पी. बाकलीवाल विद्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या आैचित्यावर विद्यार्थी, शिक्षक पालकांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेची पर्यावरण संवर्धन, झाडे लावा झाडे जगवा अशी शपथ घेतली. प्रारंभी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. शाळेच्या प्रांगणात सरपंच बद्री पाटील निर्मळ, सुरेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मनोहर घायाळ, भाऊसाहेब निर्मळ, सतीश गोजरे, दादासाहेब गहाळ, उमेश नांदरे, गणेश रंध्ये, अरुण तांबे, बळीराजे भांड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 
 
बाजारसावंगी: येथीलग्रामपंचायत कार्यालयात सरपंच लक्ष्मीबाई नलावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पंचायत समिती सदस्य प्रभाकर शिंदे, ग्रामविकास अधिकारी स्वप्निल घरमोडे, उपसरपंच पांडुरंग नलावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शोभाताई नलावडे, पुंजाजी नलावडे, किशोर नलावडे, पोपट नलावडेंसह नागरिकांची उपस्थिती होती. बाजार सावंगी पोलिस चौकीत तांबे यांचा हस्ते ध्वजारोहण झाले. विविध सहकारी सोसायटीत चेअरमन जनार्दन औटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. 

पाचोड: पाचोड खुर्द जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादासाहेब घुगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. किशोर खामकर, नितीन वाघ, भरत पालवे, रामेश्वर बनकर, राम घुगे, दिलीप वाघ, ज्ञानेश्वर वाघ, रामभाऊ वाघ, छगन ढवळे, लक्ष्मण बनकरसह विद्यार्थी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...