आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मकरंद अनासपुरेने दिले दुष्काळग्रस्तांना अडीच लाख

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई- मराठीतील ख्यातनाम सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून आला आहे. बुधवारी रात्री मानवलोक संस्थेत दुष्काळ निवारण निधी कार्यक्रमास उपस्थित राहून त्याने दुष्काळग्रस्तांसाठी अडीच लाख रुपयांचा धनादेश मानवलोकचे अध्यक्ष डॉ. द्वारकादास लोहिया यांच्याकडे सुपूर्द केला. अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक होते. तहसीलदार राहुल पाटील, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, मनोहर काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बीड जिल्ह्याचा मागासलेपणा हा कलंक पुसून काढण्यासाठी रचनात्मक कार्यातून जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन या वेळी मकरंद अनासपुरेने केले. अध्यक्षीय भाषणात अप्पर जिल्हाधिकारी अनिवाश पाठक यांनी दुष्काळग्रस्तांसाठी निधी देण्याचे आवाहन केले. डॉ. द्वारकादास लोहिया यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. अरुंधती पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.