आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लाख रुपयांच्या बनावट नाेटा घेऊन जाणारा अाैरंगाबादचा तरुण अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलकापूर - दाेन लाख रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ३३ वर्षीय व्यक्तीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली अाहे. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास मलकापूर बसस्थानकावर ही कारवाई करण्यात आली.

मलकापूर येथे एका व्यक्तीकडे बनावट नोटा असून ताे त्या चलनात अाणण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यानुसार पथकाने छापा टाकून अाराेपीला अटक केली. मनाेहर एकनाथ कापसे असे या युवकाचे नाव असून ताे औरंगाबाद शहरातील गारखेडा परिसरास वास्तव्यास असल्याची माहिती समाेर अाली. ताे मूळचा देवी गव्हाणा (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील रहिवासी आहे. पोलिसांनी झडती घेतली असता, त्याच्याकडे रोख ६४ हजार रुपये व एक लाख ९५ हजारांच्या बनावट नोटा आढळल्या. बनावट नोटांमध्ये एक हजार रुपयांच्या शंभर व पाचशेच्या १९० नोटांचा समावेश आहे. या सर्व नोटा पोलिसांनी जप्त करून त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अार. एस. सोनवणे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांत मनोहर कापसेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याने या नाेटा कुठून अाणल्या हाेत्या, याबाबत पाेलिस अधिक तपास करत अाहेत.