आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी, अजित डोभाल युद्धखोर -दिग्विजयसिंह यांची संतप्त प्रतिक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाळ हे दोघेही युद्धखोर आहेत. त्यांना भारत-पाकिस्तान युद्धाची खुमखुमी लागली आहे, अशी टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी केली आहे.
भारत आणि पाकिस्तानला युद्धाचा पर्याय परवडण्याजोगा आहे का, असा प्रश्न एका वृत्तवाहिनीवर दिग्विजयसिंह यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, की मोदी आणि डोभाल यांना मी युद्धपिपासू म्हणून बघतो. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना आणि संयुक्त पुरोगामी आघाडीची केंद्रात सत्ता असताना आम्हीही असेच सर्जिकल स्ट्राईक केले होते. पण त्यापूर्वी विरोधी पक्षांना विश्वासात घेतले होते. पण तेव्हाच्या आणि आताच्या कारवाईत स्वतःचे कौतुक करवून घेणे. सर्व श्रेय स्वतः लुटणे हा फरक दिसून येतो.
दिग्विजयसिंह म्हणाले, की नरेंद्र मोदी यांना भारत-पाक युद्ध हवे आहे, की शांतता हे त्यांनी आधी जाहीर करावे. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर पाकिस्तानशी चांगले संबंध असणे आवश्यक आहेत. त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
भाजप कार्यकर्त्यांबाबत दिग्विजय म्हणाले, की भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना सुचना दिल्या आहेत, की सर्जिकल स्ट्राईकचे भांडवल करु नका. पण पक्षप्रमुख अमित शहाच स्वतःची पाठ थोपटताना दिसून येतात.
भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या भूमिवर सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर संयुआच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सरकारचे कौतुक केले होते. पण दिग्विजयसिंह यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका मांंडून गोंधळ उडवून दिला आहे.
पुढील स्लाईडवर वाचा... सर्जिकल स्ट्राईकबद्दल काय म्हणाले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे....
बातम्या आणखी आहेत...