आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आष्टीतील मनीमाऊ झाली स्वच्छतेची ब्रँड अॅम्बेसेडर; दररोज शौचालयाचा वापर करणारे मांजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी- घरी पाळलेली मनीमाऊ कुटुंबातील सदस्यांच्या सहवासात इतकी शिस्तप्रिय झाली की ती आता नियमित शौचालयाचा वापर करते. टापटीप राखणारे हेच मांजर आता आष्टी नगर पंचायतीच्या स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानातील डिजिटल बॅनरवर झळकले आहे.

भाजी मंडईत बँक अधिकाऱ्यांच्या घरी पाळलेले हे मांजर सध्या आष्टीत चर्चेचा विषय ठरले आहे. पाळीव प्राणी आपण त्यांना शिस्त  लावू तसे अनुकरण करतात. याचाच प्रत्यय आष्टीत येत आहे. जिल्हा बँक अधिकारी संजय श्रीधर भोसले यांच्या कुटुंबीयांनी एक वर्षापासून मांजर पाळले आहे. हे मांजर शौचास व लघुशंकेसाठी शौचालयाचा नियमित वापर करते.
 
नागरिकांनी आदर्श घ्यावा
 आष्टी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी प्रदीप पांडुळ म्हणाले, मांजर शौचालयाचा वापरत असल्याचे कळताच प्रत्यक्ष माहिती घेतली. या शिस्तप्रिय मांजरीचा फोटो डिजिटल बॅनरवर लावला. लोकांनी मांजरीचा आदर्श घेऊन शौचालय बांधावीत व आष्टी शहर पाणंदमुक्त करावे.
 
डिजिटल बॅनरवर चित्र
घर व परिसर घाण न करता मांजर चक्क शौचालयाचा वापर करत असल्याची चर्चा पसरली तेव्हा पाणंदमुक्तीवर काम करत असलेल्या आष्टी नगरपंचायतीने याची दखल घेतली. मांजरीचे एक आकर्षक छायाचित्र ‘स्वच्छ आष्टी, सुंदर आष्टी’ या उपक्रमाअंतर्गत मध्यवर्ती शिवाजी चौकात बॅनरवर लावले आहे. आता हे मांजर लोकांसाठी स्वच्छतेचे रोलमॉडेल ठरले आहे.
बातम्या आणखी आहेत...