आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांजरा : ऊस लागवडीसाठी हेक्टरी 50 हजार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर : लातूर जिल्हा बँकेद्वारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये २ टक्के दराने देण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. मात्र गेल्या महिन्यात झालेल्या नोटबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा बँकेवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
त्यामुळे चलन तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना या सवलतीचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे मांजरा परिवारातील पाचही साखर कारखान्यांच्या सभासदांना ऊस लागवडीसाठी हेक्टरी ५० हजार रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मांजरा परिवाराचे प्रमुख दिलीपराव देशमुख यांनी बुधवारी मांजरा कारखान्यावर पाचही साखर कारखान्यांच्या प्रमुखांसोबत आढावा बैठक घेतली. त्याला रेणा कारखान्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील, उपाध्यक्ष सर्जेराव मोरे, मांजराचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, विकास कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंद बोराडे, तसेच मांजरा, विकास,रेणा, जागृती कारखान्यांचे कार्यकारी संचालक उपस्थित होते.

या बैठकीत दोन महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या २५ हजार रुपयांच्या कर्जपुरवठ्याची चर्चा करण्यात आली. मात्र अत्यल्प शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला असून त्याचा लाभ घेण्याच्या आतच नोटाबंदीचा निर्णय धडकला. त्यानंतर जिल्हा बँकांवर निर्बंध लादण्यात आले. त्याचा फटका शेतकऱ्यांच्या दैनंदिन व्यवहाराला बसला आहे.
त्यामुळे शेतकरी ऊस लागवडीसाठी पैसे उभे करू शकत नसल्यामुळे इतर पिकांकडे वळत आहेत, असे समोर आले. त्यामुळे साखर कारखान्यांनीच आपल्या सभासदांना हेक्टरी ५० हजार रुपये कर्जरूपाने देऊ करण्याचा निर्णय दिलीपराव देशमुख यांनी जाहीर केला
बातम्या आणखी आहेत...