आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जालन्याच्या मंजिरीचा जपानकडून सन्मान! मोदींना भेटलेल्या शिष्टमंडळाचे केले नेतृत्व

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जपानी संशोधकांशी संवाद साधला. या कार्यक्रमासाठी जपानने चार भारतीय संशोधकांना निमंत्रित केले होते. या संशोधकांच्या चमूचे नेतृत्व जालन्याच्या २८ वर्षीय मंजिरी रवींद्र कुलकर्णीने केले.
मंगळवारी दुपारी टोकियो येथे हा कार्यक्रम झाला. संशोधकांकडून आपल्या काय अपेक्षा आहेत, त्याचा भारताला कसा उपयोग होईल याबाबत मोदींनी या वेळी भाष्य केले. त्यांच्या या भाषणाने आपल्यासह उपस्थित सर्वच संशोधक उत्साहित झाल्याचे मंजिरीने "दिव्य मराठी'ला सांिगतले. पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी जपानच्या दूतावासाकडून मंजिरीला बुधवारी निमंत्रण मिळाले होते. मंजिरी टोकियोतील जपान विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागात रिसर्च फेलो आहे. तिला संशोधनासाठी जपान सरकारकडून लाख ६५ हजार येन शिष्यवृत्ती मिळते.

डेंग्यूचीलस शोधायचा ध्यास : मंजिरीजेईएस कॉलेजची विद्यार्थिनी आहे. ती जपानमध्ये डेंग्यू - या डासावर संशोधन करत आहे. डेंग्यूने अनेकांना प्राण गमवावा लागतो. त्यामुळे डेंग्यूवर लस शोधण्याचा तिचा प्रयत्न आहे.

संशोधनाच्या माहितीचे पत्र मोदींना सादर
संशोधनाचा भारताला उपयोग होईल याचा विचार करावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी कार्यक्रमादरम्यान केले होते. मोदींचे भाषण संपल्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या वेळी मंजिरीने आपण डेंग्यूवर संशोधन करत आहोत. डेंग्यूची लस शोधण्यात यश मिळाले तर देशाला त्याचा उपयोग होईल, असे मोदी यांना सांगितले. त्यानंतर तिने तिच्या संशोधनाची माहिती असलेले पत्र पंतप्रधान मोदी यांना दिले. तेव्हा मी यासंदर्भात आपल्याला कळवतो असे मोदी यांनी मंजिरीला सांगितले.

उत्साह वाढला
पंतप्रधानांनी जपानमध्ये येऊन आमच्याशी संवाद साधला.आमचे संशोधन भारतासाठी उपयुक्त ठरावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या भेटीमुळे माझा उत्साह द्विगुणित झाला. मंजिरी कुलकर्णी, जपानमधील संशोधक विद्यार्थिनी