आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - कळंबसह अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा येथे शुक्रवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने मांजरा धरणात ६५० क्युसेकने पाण्याची आवक वाढली असून मांजरा धरणाचे सहा दरवाजे शनिवारी सकाळी आठ वाजता दीड मीटरने उघडण्यात आले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यातील घाटनांदूर महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सहा वर्षांनंतर केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण १०० टक्के भरले असून बीडसह उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. कळंबसह अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा शिवारात शुक्रवार रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मांजरा धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीच १२ वाजता प्रकल्प अधिकाऱ्यांनी मांजरा धरणाकडे धाव घेत सुरुवातीला दोन दरवाजे उघडले. त्यानंतर सकाळी आठ वाजता आणखी चार दरवाजे उघडण्यात आले.
तालुक्यात मुसळधार
बीड जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठपर्यंत २४ तासांत १४.५ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस अंबाजोगाई तालुक्यात झाला असून तो ४१.४० मिलिमीटर आहे. घाटनांदूर महसूल मंडळात ९० मिलिमीटर पाऊस झाल्याने तो अतिवृष्टीत नोंदला गेला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६६६.३६ मिलिमीटर अाहे. या तुलनेत आतापर्यंत ७४७.९८ मिलिमीटर पाऊस झाला अाहे.
पाण्याचा ओघ वाढला
शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा धरणात पाण्याचा ओघ वाढलेला असून जर पाणी वाढले तर अन्य दरवाजे उघडण्याच्या तयारीत आहोत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
अनिल मुळे, कनिष्ठ अभियंता, मांजरा धरण.
बातम्या आणखी आहेत...