आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manjra Project Kej And Dharur Village Water Problem

धनेगावच्या मांजरा प्रकल्पाने तळ गाठल्याने 12 खेड्यांची पाणी योजना बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केज - धनेगावच्या मांजरा प्रकल्पाने तळ गाठल्याने केज, धारूरसह 12 गावांची पाणीपुरवठा योजना बंद झाली आहे. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पालिकेकडून प्रकल्पात टाकण्यासाठी आलेल्या प्लोटिंग पंपाचाही प्रयत्न आता निष्फळ ठरला असून चर खोदण्यासह गाळाचा अडसर होऊ लागला आहे. त्यामुळे नगर पंचायतीकडून शहरातील हातपंपाच्या ठिकाणी सिंगल फेज मोटारी टाकून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मांजरा प्रकल्पाने तळ गाठलेला असताना लातूर एमआयडीसीला पाण्याचा विसर्ग झाल्याने पातळी खालावली. नगर पंचायतीने शहरातील अनेक हातपंप काढून त्या ठिकाणी सिंगल फेज मोटारी बसवल्या आहेत. केजसाठी जवळबन येथून तर धारूरसाठी तांदुळवाडी या उद्भवातून 10 टॅँकरची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.