आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Many Officers Absent In Drought Meetiing In Paithan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळी बैठकीकडे अधिकार्‍यांची पाठ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - अधिकार्‍यांना दुष्काळी परिस्थितीची जाण नसून ते यास गांभीर्याने घेत नसल्याने उपस्थित बोटावर मोजण्या इतक्या अधिकार्‍यांना पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर धारेवर धरले होते. ते पैठण तालुक्यातील दुष्काळी भागात पाहणी दौरा करण्यासाठी आले होते. त्या वेळी पैठण येथे आयोजित आढावा बैठक आयोजित केली होती. बैठकीला शेतकर्‍यांपेक्षा भाजपच्या कार्यकर्त्यांचा भरणाच अधिक दिसून आला. बहुतांश प्रशासकीय अधिकार्‍यांनी मात्र बैठकीकडे पाठ फिरवली होती.

जिल्हास्तरीय आढावा बैठकीला आमदार संदिपान भुमरे, नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, उपनगराध्यक्षा रेखा कुलकर्णी यांच्यासह अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार संजय पवार आदींची उपस्थिती होती. या बैठकीला केवळ बोटावर मोजण्याइतकेच पैठणचे अधिकारी होते.

जिल्हास्तरीय बैठकीला इतर जबाबदार अधिकार्‍यांनी पाठ फिरवल्याने मंत्री लोणीकर यांनी संताप व्यक्त करत कुणाला सूचना दिल्या नाहीत का, तुम्ही झोपा काढता काय, दुष्काळात शेतकर्‍यांची थट्टा करू नका, कामे करा, अशा सूचना ही लोणीकर यांनी दिल्या.

शेतकर्‍यांनो, हिंमत हरू नका; सरकार तुमच्या पाठीशी
पाचोड | आत्महत्या करून सर्व प्रश्न सुटत नाहीत. उलट कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. त्यामुळे शेतकर्‍यांनो, धीर ठेवा, हिंमत हरू नका, सरकार तुमच्या पाठीशी असल्याचा दिलासा पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी बुधवारी दिला. पाणीटंचाईची पाहणी करण्यासाठी ते पैठण तालुक्याच्या दौर्‍यावर आले होते. दरम्यान, त्यांनी पाचोड येथे सकाळी शेतकर्‍यांशी संवाद साधत पाणीटंचाईसह दुष्काळी परिस्थितीची भीषणता जाणून घेतली. या वेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाबूराव पडुळे, सरपंच अंबादास नरवडे, मजूर फेडरेशनचे जिल्हा उपाध्यक्ष राजू भुमरे, मनोज नरवडे, रामभाऊ नरवडे, शिवाजी भुमरे, जिजा भुमरे, विठ्ठल भुमरे, संचालक अकुंश म्हस्के, दामोदर तारे, अरुण कळमकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.