आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा समाजाच्या समर्थनार्थ मुस्लिम समाजही सरसावला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी लाखो समाजबांधवांच्या निघणाऱ्या मूकमोर्चाची देशभरात चर्चा होत आहे. उस्मानाबादेत एक पाऊल पुढे जाऊन मराठा समाजाच्या या मागण्यांना मुस्लिम समाजानेही पाठिंबा दिला आहे.
अॅट्रॉसिटीमध्ये सुधारणा करण्याची गरज व्यक्त करून प्रमुख मुस्लिम संघटनांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठवले आहे.
यासंदर्भात माहिती देण्यासाठी मुस्लिम समाजातील नेते, पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्हाभरातून विविध मुस्लिम संघटना, राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी असे ११० जण निवेदन देण्यासाठी उस्मानाबादेत आले हाेते. मराठा समाजाप्रमाणेच मुस्लिम समाजाचीही अवस्था मागासलेलीच आहे. मराठाप्रमाणे मुस्लिम समाजही आरक्षणासाठी लढा देत आहे. दोघांच्या मागण्या एकच व रास्त आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा या आंदोलनात मराठा समाजाने हाक दिल्यास मुस्लिम बांधवही मोठ्या संख्येने सहभागी होतील, असे स्पष्ट केले. कोपर्डीचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला लवकर फाशी द्यावी, अॅट्रॉसिटीचा गैरवापर टाळून कायद्यात सुधारणा कराव्यात आदी मागण्या केल्या. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सरचिटणीस मसूद शेख, मराठवाडा मुस्लिम आरक्षण कृती समितीचे कादरखाँ पठाण, जमेतुल उलेमाचे मौलाना सय्यद शौकत अली, जमाते इस्लामचे सिकंदर पटेल, उपनगराध्यक्ष खलिफा कुरेशी, काँग्रेस गटनेते खलील सय्यद, समियोद्दीन मशायक आदी ११० जणांची नावे आहेत.
बातम्या आणखी आहेत...