बीड/जालना/लातुर/उस्मानाबाद/हिंगोली/परभणी- मराठा समाजास शिक्षण नोकरीमध्ये आरक्षण, कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फासावर लटकवण्यात यावे, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवण्यात यावा आदी मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी मराठवाड्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. किरकोळ प्रकार वगळता आंदोलन शांततेत पार पडले. दरम्यान, माजलगाव येथे सिंदफणा नदीच्या पुलावर चक्का जाम केल्यामुळे काही वाहनचालक पादचाऱ्यांनी नदीपात्रातूनच वाट काढली.
सिंदफणा नदीच्या पुलावर रास्ता रोको
माजलगाव येथे मराठा समाजाच्या वतीने सिंदफणा नदीच्या पुलावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे काही वाहनचालक पादचाऱ्यांनी नदीपात्रातूनच वाट काढली.
बीड आंदोलन शांततेत, जिल्ह्यातील वाहतूक विस्कळीत
सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत परळी, पाटोदा, माजलगाव वडवणी येथे वाहतूक विस्कळीत झाली होती. केजमध्ये पोलिसांनी आंदोलकांना काही वेळ अटक करून नंतर जामिनावर सोडून दिले. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सकाळी साडेदहा वाजता चक्काजाम आंदोलन केले. दुपारी एक वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. परळी तालुक्यातील सिरसाळा येथे चक्काजाम आंदोलनामुळे बीडहून परळीकडे येणारी-जाणारी, गंगाखेडहून परळीकडे जाणारी वाहतूक दोन तास खोळंबली होती, तर केज येथे आंदोलन मागे घेतले जात नसल्याचे पाहून पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी काही आंदोलनकर्त्यांना अटक करून पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर सोडून दिले.
पुढील स्लाइडवर वाचा...
>हिंगोली सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग, २५ ठिकाणी मराठा समाजाचे आंदोलन...
>परभणी सकाळी दहा वाजेपासून समाजबांधव उतरले रस्त्यावर...
>लातूर शहराकडे येणारी वाहतूक रोखली
>जालना वीस ठिकाणी समाजबांधव रस्त्यावर
>उस्मानाबाद संघटना, पक्षांचा जाहीर पाठिंबा
>परभणीत रुग्णवाहिकेस आंदोलकांनी तत्काळ मोकळा करून दिला रस्ता रस्ता...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)