आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडमध्ये मराठा समाजाचा अभूतपूर्व मूकमोर्चा; 12 लाखांच्या गर्दीने सर्व उच्चांक मोडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने कोपर्डीतील घटनेच्या निषेधार्थ नवीन मोंढा ते शिवाजी पुतळा असा प्रचंड मूकमोर्चा काढण्यात आला. छाया : नरेंद्र गडप्पा - Divya Marathi
नांदेड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने कोपर्डीतील घटनेच्या निषेधार्थ नवीन मोंढा ते शिवाजी पुतळा असा प्रचंड मूकमोर्चा काढण्यात आला. छाया : नरेंद्र गडप्पा
नांदेड - कोपर्डी बलात्काराचा निषेध, मराठा समाजास आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा या आणि अन्य मागण्यांसाठी नांदेड शहरात रविवारी सकल मराठा समाजाच्या वतीने प्रचंड मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सुमारे १२ लाख समाजबांधव रस्त्याच्या दुतर्फा सहभागी झाल्याचा अंदाज आहे. मात्र, मोर्चात २० लाख लोक सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. नांदेड शहराच्या इतिहासात एवढा मोठा हा पहिलाच मोर्चा असल्याचे जाणकारांनी सांगितले. मोर्चात खासदार अशोक चव्हाण, त्यांच्या पत्नी आमदार अमिता चव्हाण यांच्यासह माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हेही सहभागी झाले होते.

मोर्चासाठी येथील नवा मोंढा मैदानात सकाळी आठ वाजेपासूनच मराठा समाजबांधव एकत्र येत होते. काही जण तर रात्रीपासूनच या मैदानात मुक्कामासाठी आले होते. मोर्चासाठी येणारे समाजबांधव व महिला-मुलींची संख्या पाहता सकाळी दहा वाजता सुरू होणारा मोर्चा अकराच्या सुमारास मोंढा मैदानातून सुरू झाला. हा मोर्चा आयटीआय चौक, शिवाजीनगर, कलामंदिर, वजिराबाद चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. त्यानंतर पाच मुलींच्या हस्ते जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चाची तयारी मागील २० दिवसांपासून सुरू होती. त्यासाठी नांदेड शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने बैठकही घेण्यात आली होती. मोर्चाच्या नियोजनासाठी गाव व तालुकानिहाय बैठका घेण्यात आल्या.

मुस्लिम समाजाच्या वतीने पाण्याची व्यवस्था
मोर्चेकऱ्यांसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने शिवाजीनगर मशिदीजवळ पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. याबरोबरच कलामंदिरजवळ राजपूत समाजाच्या वतीने नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे मराठा समाजाच्या वतीनेही मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
पुढे वाचा...
> ३ हजार शिक्षकांची नियुक्ती
> नेत्यांचे एकला चलो..
> स्वयंसेवकांना प्रशिक्षण
> आयोजक म्हणतात, २० लाख लोकांचा सहभाग
> पोलिसांचा चोख बंदोबस्त
> भगवे अन् निषेधासाठी काळेही..
येथे पाहा, हिंगोलीत नजर जाईल तिकडे मराठा, नजर जाईल तिथे भगवा, पाहा photos

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...