आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती मोर्चा: हिंगोलीत नजर जाईल तिकडे मराठा, नजर जाईल तिथे भगवा, पाहा photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - क्रांती मोर्चांनी शनिवारी शहर व जिल्ह्याच्या इतिहासातील सुमारे ६ लाखांची रेकॉर्डब्रेक गर्दी खेचली. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्यात यावा या व इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या या मूकमोर्चाने भव्यतेसोबतच शिस्त आणि संयमाचेही आदर्श समोर ठेवले.

सकाळी ८ वाजेपासूनच जि. प. बहुविध प्रशालेच्या मैदानावर मोर्चेकरी मराठा समाजाची खचाखच भरलेली वाहने दाखल होऊ लागली. अवघ्या २ तासांत ३ लाख नागरिक बसण्याची क्षमता असलेले मैदान भरून गेले. त्यानंतरही मराठा बांधव शहरात येतच होते आणि ११ वाजेपर्यंत शहराचे सर्व रस्ते मोर्चेकऱ्यांनी खचाखच भरू लागले. याच सुमारास जिल्हा परिषद मैदानावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. समोर महिला आणि विद्यार्थिनी व त्यामागे पुरुष होते. सिटी क्लब, पोस्ट ऑफिस, जवाहर रोड, गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा सुमारे पाच किमी अंतराचा रस्ता मोर्चेकऱ्यांनी खचाखच भरून गेला होता. एक टोक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचले असताना दुसरे टोक जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावरच होते. विशेषबाब म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्यावरही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारे रस्ते वाहतच होते. जिल्हाधिकारी भंडारी यांना निवेदन देण्यापूर्वी विद्यर्थिनींनी सामूदायिक जिजाऊ वंदना घेतली. त्यानंतर निवेदन वाचवून दाखवले. त्यानंतर सव्वा वाजता राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, खासदार छत्रपती संभाजीराजे काय म्‍हणाले आणि पाहा क्‍लिक करुन पाहा, हिंगोलीतील मोर्चाला अशी झाली गर्दी..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...