आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयगावात मराठा क्रांतीचा 'एल्गार'; मोर्चानेही निर्माण केला शिस्तीचा आदर्श

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव- मराठा क्रांती मोर्चांचे आयोजन आता तालुकापातळीवर सुरू असून वैजापूर, सिल्लोडनंतर सोमवारी सोयगावात समाज बांधवांनी एकत्र येत मूक मोर्चा काढला. या मोर्चानेही शिस्तीचा आदर्श निर्माण केला. मोर्चात २० हजारांची संख्या होती असा दावा आयोजनकांनी केला आहे.

मोर्चाची सुरुवात सोयगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवार बायपास रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस शिवकन्येच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आली. भवानीपुरा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, जुने पोस्ट ऑफिस गल्ली, वाल्मीक मंदिर, छत्रपती शिवाजी चौक, एस.टी.बसस्थानक, रामजीनगर.तहसील कार्यालयामार्गे एस.टी.आगार सोयगाव पर्यंत येऊन मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीर सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर राष्ट्रमाता जिजाऊ यांची वंदना घेण्यात आली. तसेच शिवकन्येच्या हस्ते प्रशासनास मंचावर येण्याची विनंती करून निवेदन देण्यात आले. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार संतोष बनकर,पोलिस उपअधीक्षक सिल्लोड बाजीराव मोहिते सोयगाव सहायक पोलिस निरीक्षक संजय सहाने यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. मोर्चा संपल्यावर मराठा समाजाच्या तरुणांनी सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वछ केला. मोर्चा अभूतपूर्व झाल्याची चर्चा होती.
बातम्या आणखी आहेत...