आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज कन्नड येथे मराठा क्रांती मोर्चा, उदयनराजेंची उपस्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - कोपर्डी हत्याकांड मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी कन्नड येथे साेमवार, दि. २१ रोजी मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून मोर्चात छत्रपती उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे. रविवारी (दि.२०) सायंकाळी ते औरंगाबाद येथे येणार असून सोमवारी (दि.२१) सकाळी वेरूळ येथील स्मरकास भेट देऊन कन्नडला मोर्चात सहभागी होणार आहे.

गिरणी ग्राउंड येथून निघालेला मोर्चा कॉलेज रोड, कॉलेज गेट, हिवरखेडा रोड, कन्या शाळा, बीएसएनएल कार्यालय, शनिमंदिर, सिद्दिकी चौक, शिवाजी महाराज पुतळा येथे वळसा घालून पुन्हा परत तहसीलसमोरून अण्णाभाऊ साठे चौक, पुढे महामार्गावरील विश्रामगृहासमोरून उजव्या बाजूने, बाळासाहेब पवार चौक, हिवरखेडा नाका, कॉलेज रोड शेवटी गिरणी ग्राउंड येथे समारोप होणार आहे.

या ठिकाणी जिजाऊ वंदनेने कार्यक्रमास सुरुवात होईल. पाच शिवकन्या मोर्चाची भूमिका स्पष्ट करून मराठा समाजाच्या विविध मागण्या मांडतील. यानंतर हे मागण्यांचे निवेदन सदर मुली येथे उपविभागीय अधिकारी यांना सादर करतील.

पाच ठिकाणी वाहनतळ
ग्रामीण भागातून इतर ठिकाणांहून मोर्चासाठी वाहनांनी येणाऱ्या मोर्चेकऱ्यांची वाहने उभी करण्यासाठी शहराशेजारी पाच वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात पिशोर रोडने येणाऱ्या वाहनांसाठी ब्राह्मी गराडा रोडवर गॅस गोडाऊनजवळ, चिकलठाण मार्गेयेणाऱ्या वाहनांसाठी उरूस मैदान, चाळीसगावमार्गे येणाऱ्या वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्गावर नगर परिषद पाणी फिल्टर येथे, म्हाडा कॉलनी मागे, औरंगाबादमार्गे येणाऱ्या वाहनांसाठी सरस्वती कॉलनीशेजारी शिवना नदी किनाऱ्यावरील परिसर येथे वाहनतळ उभारण्यात आले आहेत. शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनांची गर्दी होणार नाही यासाठी बाहेरून येणारी सर्व वाहने वाहनतळावरच उभी करण्याचे आवाहन समितीने केले आहे. मोर्चासाठी पोलिस महसूल प्रशासनाने जय्यत तयारी केली असून समितीतर्फे बाराशे स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोर्चात तालुक्यातील जिल्ह्यातील मराठा समाजबांधवांनी सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन समितीने केले आहे.
बातम्या आणखी आहेत...