आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅट्रॉसिटी रद्दची मागणीच नाही तर आक्रोश कशाचा? समितीचे राज्य अध्यक्ष सुभाष जावळे यांचा सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी राज्यभर सुरू झालेल्या आंदोलनातून अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग वाढू नये यासाठी या कायद्यात दुरुस्तीची मागणी करण्यात आलेली आहे. हा कायदाच रद्द करण्यात यावा, अशी मागणी नसताना अाक्रोश मोर्चा कशासाठी काढला जात आहे, असा सवाल मराठा आरक्षण समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष सुभाष जावळे यांनी शनिवारी (दि.१५) येथे पत्रकार परिषदेत केला.

अॅट्रॉसिटी कायदा संरक्षण समितीच्या वतीने सोमवारी (दि.१७) परभणीत आक्रोश मोर्चाचे आयोजन केल्याबाबत जावळे यांनी मराठा आरक्षण समन्वय समितीची भूमिका मांडताना अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांच्या अनुषंगाने काही नेतेमंडळीचे धंदे बंद होणार असल्याने आक्रोश मोर्चासारखे प्रकार होऊ लागले आहेत, असाही आरोप त्यांनी केला. जावळे म्हणाले, काहींनी अॅट्रॉसिटीचा गैरवापर आमिषापोटी केला. त्यामुळे या कायद्यात सुधारणा होण्याची गरज आहे. मराठा आरक्षणाचा प्रमुख मुद्दा असून न्यायालयात मुद्दा टिकण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने विधिमंडळात याबाबतचा ठराव घेऊन तो केंद्र शासनाकडे पाठवावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे. मराठा व कुणबी एकच असल्याने त्यांना सरसकट ओबीसीचे आरक्षण देण्यात यावे, इतर कोणत्याही प्रवर्गाचे आरक्षण काढून ते देण्यात येऊ नये, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली जाणार आहे. या प्रश्नावर राज्यभर आंदोलन सुरू असून नागपूरचा मोर्चा हा मुख्यमंत्र्यांच्या घरावर नव्हे, तर अधिवेशनावर काढला जाईल. तत्पूर्वी मुंबईतदेखील मोर्चा काढला जाईल, अशीही माहिती अध्यक्ष जावळे यांनी दिली. कोपर्डी प्रकरणाचा सहा महिन्यांत निकाल लावावा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास १० हजार कोटींची तरतूद करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात, शिवस्मारकाचे काम १९ फेब्रुवारी २०१७ अखेर सुरू करण्यात यावे, शेतकऱ्यांना कर्जमाफी व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे पुनर्वसन करावे आदी मागण्या सरकारकडे या मोर्चाद्वारे करण्यात येणार असल्याचेही जावळे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस रामेश्वर शिंदे, विठ्ठल तळेकर, विजय कदम, सोपानराव शिंदे, भाऊसाहेब गिराम आदी मराठा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...