आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलनाध्यक्षांना जिवे मारण्याच्या धमक्या, उमरग्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरगा/ उस्मानाबाद / जालना - मोदींबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना विरोध वाढू लागला आहे. उमरगा येथे एका समारंभात त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले. त्यानंतर दोघांनी माेबाइलवर त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सबनीस यांना पाेलिस संरक्षण देण्यात अाले अाहे.

शनिवारी उमरग्यात कॉ.विठ्ठल सगर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित व्याख्यानासाठी सबनीस आले होते. या वेळी त्यांना फोनवर दोन वेळा जिवे मारण्याची धमकी मिळाली. सबनीसांनी पोलिसांत फिर्याद दिली. "दुपारी १.११ मिनिटांच्या दरम्यान मोबाइलवरून हिरामण गवळी व थोड्या वेळाने अनुप अग्रवाल यांनी "मोदींची बदनामी केल्याबद्दल माफी माग नाहीतर तुला मारून टाकू'अशी धमकी दिली. मी मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष असून माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या जिवाला धोका आहे. मला व कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे,' असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून हिरामण गवळी व अनुप अग्रवाल यांच्याविरुद्ध कलम ५०७,३४ भादंविप्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.

भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे
उमरग्यात सबनीसांचे व्याख्यान चालू असताना भाजपचे कैलास शिंदे, माधव पवार यांच्या नेतृत्वाखाली १५ ते २० कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी आले. त्यांनी मोदींच्या विरोधात बोलल्याप्रकरणी जाहीर माफी मागा, असे म्हणत काळे झेंडे दाखवून घोषणा दिल्या.

सबनीसांविरुद्ध धुळ्यात अदखलपात्र गुन्हा
मोदींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे श्रीपाल सबनीसांविरुद्ध भाजपचे अनुप अग्रवाल यांच्या तक्रारीवरून धुळ्यात भादंविच्या ५०५ कलमानुसार अदखलपात्र तक्रार दाखल करण्यात आली आहे. संमेलनाच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पुढे वाचा, ... तर सांस्कृतिक दहशतवाद वाढल्याचे दिसेल : सबनीस
बातम्या आणखी आहेत...