आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्‍ह्यातील धर्मापूरी किल्‍ला, पाहा मुस्‍लीम राजवटीतील कलाकृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - जिल्ह्यातील आंबेजोगाई हे प्राचीन गाव. येथील ब्राम्हणी लेणी व योगेश्वरी देवीचे मंदिर यामुळे प्रसिध्द आहे. आंबेजोगाई पासून 27 किलोमिटर अंतरावर धर्मापूरी हे प्राचीन धर्मक्षेत्र आहे. येथे मुसलमानी राजवटीच्या काळात किल्ला बांधला गेला. या किल्ल्याला धर्मापूरीचा किल्ला म्हणून ओळखले जाते. 1 मे या महाराष्‍ट्रदिनानिमित्‍त जाणून घेऊया या गिरीदुर्गाबाबत...
- धर्मापूरीचा किल्ला बांधण्यासाठी वापरलेल्‍या दगडांवर मंदिरांवरील शिल्प दिसतात.
- यावरून या गावात प्राचीन काळात अनेक मंदिरे होती, असे लक्षात येते.
- अप्रतिम व कोरीव शिल्पे असलेले केदारेश्वर मंदिरही विशेष पाहण्‍यासारखे आहे.
- या किल्‍ल्याबाबत फार इतिहास उपलब्‍ध नसल्‍याचे सांगितले जाते.
- किल्‍ला गावातील छोट्याशा उंचवट्यावर असला तरी तो आवर्जून पाहण्‍यासारखा आहे.
वैशिष्‍ट्यपूर्ण बांधकाम....
- धर्मापूरी गावातून वाहनाने थेट किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जाण्‍याची सोय आहे.
- किल्‍ल्याची तटबंदी एकेरी आहे. त्‍यांची उंची 70 फूट असून त्यात 9 अष्टकोनी बुरुज आहेत.
- चर्या, तटबंदी व बुरूज यावरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बनवलेल्या आहेत.
- किल्ल्याला एकामागोमाग एक असे 2 दरवाजे दिसतात.
- मुख्य द्वाराला संरक्षण देण्यासाठी तेवढ्याच भागात परकोट बांधलेला आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, या आहेत किल्‍ल्यातील काही खास बाबी....
वाचा किल्‍ल्यापर्यंत कसे पोहोचता येईल....